‘सोलार मॅन’ ११ वर्षे करणार सौरऊर्जेची बसमधून जागृती!

प्रा. चेतनसिंग सोलंकी यांची ‘एनर्जी स्वराज यात्रा’ शहरात
प्रा. चेतनसिंग सोलंकी
प्रा. चेतनसिंग सोलंकीsakal

औरंगाबाद : ऊर्जा बचतीचा संदेश घेऊन २०२० मध्ये भोपाळहून निघालेली ‘एनर्जी स्वराज’ यात्रा गुरुवारी (ता. २१) शहरात पोचली. संपूर्ण सौरऊर्जेवर चालणारी ही बस घेऊन आयआयटी मुंबईचे प्रा. चेतनसिंग सोलंकी यांनी ऊर्जा बचतीच्या जनजागृतीसाठी यात्रा सुरू केली आहे. पुढील ११ वर्षे ते याच बसमधून देशभर जनजागृती करणार आहेत. प्रा. चेतनसिंग सोलंकी यांनी शहरात इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, एमजीएम विद्यापीठासह विविध महाविद्यालयांना भेटी देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. एमजीएममध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले. कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ आदी उपस्थित होते.

प्रा. चेतनसिंग सोलंकी
कष्टातून पिकवलेली केळी पोचली इराणला

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रा. चेतनसिंग सोलंकी म्हणाले, की पर्यावरण बदल फार आधीच सुरू झालेला आहे. शिवाय, काळानुरूप पर्यावरण बदलाची कारणेही बदलली आहेत. दुष्काळ, महापूर, हिमवर्षाव किंवा हिमनग कोसळण्याच्या प्रत्येक घटना याच बदलाचे रूप आहेत. सध्या पृथ्वीचे तापमान १.२ अंश सेल्सिअसने वाढले आहे. ते जर दोन अंशापर्यंत वाढले तर या ग्रहालाच धोका आहे. सध्या सेकंदाला १३ लाख युनिट कार्बन उत्सर्जन होते.

त्यामुळे केवळ वृक्षारोपण केल्याने प्रश्न मिटणार नाही तर आपल्याला कार्बनचा वापरच थांबवावा लागेल. यासाठी ऊर्जेचा वापर टाळणे, कमी ऊर्जा वापरणे किंवा पर्यायी ऊर्जा तयार करणे हेच सूत्र महत्त्वाचे आहे. खिडकीचे पडदे, रेफ्रिजरेटर यासारख्या गोष्टी ऊर्जारोधक आहेत आणि आपण ते सर्रास वापरतो. प्रत्येक नागरिकांमध्ये ऊर्जा साक्षरता यावी, यासाठी ही यात्रा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जर पर्यावरणाचा ऱ्हास असाच सुरू राहिला तर कदाचित पुढील ३ ते ४ हजार वर्षांत मानव प्रजातच नष्ट होऊ शकते अशी भीती चेतनसिंग सोलंकी यांनी व्यक्त केली.

प्रा. चेतनसिंग सोलंकी
जामनेरातही निर्यातक्षम केळी उत्पादन,इराणला जाणार प्रथमच केळी

बसमध्येच उदरनिर्वाह

प्रा. चेतनसिंग सोलंकी यांनी आयआयटी मुंबईतून एम. टेक तर बेल्जियममधून सौरऊर्जेत पीएच.डी. केली आहे. त्यांना सोलार गांधी किंवा सोलार मॅन म्हणूनही ओळखले जाते. लोकांमध्ये ऊर्जा बचतीबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने त्यांनी एका बसमधून २०२० ते २०३० दशकभराची यात्रा नियोजित केली आहे. यादरम्यान ते घरी जाणारच नाही असा त्यांचा निश्चय आहे. या बसमध्येच त्यांनी छोटे घर बनवले आहे. ज्यामध्ये बसण्याची, झोपण्याची व्यवस्था, स्वयंपाकघर, स्वच्छतागृह अशा सर्व सुविधा आहेत. पुढील ११ वर्षे ते याच बसमधून जनजागृती करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com