esakal | तो व्हिडिओ जूनाच!!! पोलिस अधीक्षक घेणार व्हायरल करणाऱ्यांचा शोध
sakal

बोलून बातमी शोधा

Mokshada Patil

औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचा १३ एप्रिल २०२० रोजी जनहितार्थ संदेश देणारा एक व्हिडिओ प्रसारीत करण्यात आला होता. ३० एप्रिल पर्यंतच्या लोक डाऊन बाबतची त्यात माहिती होती. दरम्यान, सोमवारी (ता.११) सदर व्हिडिओ हा सोशल मीडियावर पाठविला जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

तो व्हिडिओ जूनाच!!! पोलिस अधीक्षक घेणार व्हायरल करणाऱ्यांचा शोध

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचा १३ एप्रिल २०२० रोजी जनहितार्थ संदेश देणारा एक व्हिडिओ प्रसारीत करण्यात आला होता. ३० एप्रिल पर्यंतच्या लोक डाऊन बाबतची त्यात माहिती होती. दरम्यान, सोमवारी (ता.११) सदर व्हिडिओ हा सोशल मीडियावर पाठविला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे जनतेची दिशाभूल होत असल्याने हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याचा शोध घेतला जाईल, असा इशारा श्रीमती पाटील यांनी दिला आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

त्या व्हिडिओ मध्ये ३० मे बाबत लोक डाऊन वाढवला असा त्याचा काही जण अर्थ करून घेत आहेत परंतु पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सदर विषयाचा खुलासा करण्यात येतो की सदर क्लिप ही मागील महिन्यातील होती व मागील महिन्याच्या ३० एप्रिल पावेतो बाबत त्यात उल्लेख केला गेलेला आहे.

कृपया सदर क्लिप मधील तारखेबाबत कोणीही संभ्रम निर्माण करू नये व सदर क्लिप या महिन्याची आहे असे मानून कोणालाही फॉरवर्ड करू नये याबाबत कोणालाही शंका असल्यास  जनसंपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय श्री दिनेश जाधव ८८०५०००५७७, ९९२३७८७८८७ यांना अथवा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे फोन द्वारे विचारणा करू शकतात असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

गावात कोणालाच येऊ न देण्याचा ठराव
औरंगाबाद : शहरात तसेच सातारा, देवळाई भागात कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता खबरदारीचा उपाय म्हणून शहरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने गावाच्या सीमा तीनही बाजूंनी बंद करण्यात आल्या आहेत. गावाच्या सीमेवर ग्रामसुरक्षा दल तैनात केले असून आता बाहेरच्या गावातून येणाऱ्या व्यक्तीला प्रवेश बंदीचा ठरावच ग्रामपंचायतने घेतला आहे.

बाळापूर येथील चेकपोस्टवर बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश बंदी केली आहे. गावात दवंडी देऊन पाहुण्यांना आपल्या घरात न घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. असे आढळून आले तर कायदेशीर कारवाईचा इशाराही ग्रामपंचायतने दिला आहे. दुध विक्री किंवा अत्यावश्यक कामासाठी कुणी बाहेर गेल्यास चेकपोस्टवर बाहेरून आलेल्या वाहनावर सॅनिटाईझर फवारणी करून वहात सॅनिटायझरने स्वच्छ केल्यानंतरच गावात प्रवेश दिला जात आहे.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

loading image
go to top