esakal | एसटीचा चालक कोरोना पॉझीटीव्ह; अहवालाआधीच पाठविले फेरीवर, सिल्लोड आगाराचा प्रताप
sakal

बोलून बातमी शोधा

3corona_1180

मुंबई येथे बेस्टच्या सेवेत कर्तव्यासाठी पाठविलेल्या आगारातील चालक व वाहक यांची कोव्हिड चाचणी न करताच त्यांना सिल्लोड येथे कर्तव्यावर बोलविण्यात येत असल्यामुळे चालक व वाहकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

एसटीचा चालक कोरोना पॉझीटीव्ह; अहवालाआधीच पाठविले फेरीवर, सिल्लोड आगाराचा प्रताप

sakal_logo
By
सचिन चोबे

सिल्लोड (जि.औरंगाबाद)  : मुंबई येथे बेस्टच्या सेवेत कर्तव्यासाठी पाठविलेल्या आगारातील चालक व वाहक यांची कोव्हिड चाचणी न करताच त्यांना सिल्लोड येथे कर्तव्यावर बोलविण्यात येत असल्यामुळे चालक व वाहकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. महत्वाचे म्हणजे सिल्लोड येथील चालकाला गुरूवारी (ता.१०) जालना फेरीसाठी पाठविण्यात आले. त्यांचा कोव्हिड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना फेरीवरून उतरून घेण्यात आले.

फेरी दरम्यान चालक किती नागरिकांच्या संपर्कात आले असेल याचा ताळमेळच लागत नसून, आगाराचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. सिल्लोड आगारातील २१ चालक, २१ वाहकांना मुंबई येथे १५ दिवसांसाठी बेस्टसेवेत कर्तव्यासाठी पाठविण्यात आले होते. मुंबई येथून आल्यानंतर या सर्वांची कोव्हिड-१९ चाचणी करणे आवश्यक होते. परंतू यासाठी पाठपुरावाच झाला नाही. सोमवारी सहा कर्मचारी मुंबई येथून आले.

त्यांची सहा जणांची कोव्हिड-१९ चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल आल्यानंतरच त्यांना कर्तव्यावर घेणे गरजेचे होते. परंतू तसे न करता यातील चालकास गुरूवारी जालना फेरीसाठी पाठविण्यात आले. फेरीला गेल्यानंतर चालकाचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्यानंतर तातडीने संबंधित चालकास सिल्लोड येथे आल्यानंतर कर्तव्यावरून उतरून घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. संबंधित चालक कर्तव्यादरम्यान किती नागरिकांच्या संपर्कात आले, याची तपासणी कशी करणार हा प्रश्नच आहे.

Edited - Ganesh Pitekar

loading image