
Sambhaji Nagar Rain : संभाजीनगरमध्ये सध्या सोसाट्याचा वारा आणि धुळीचं साम्राज्य पसरलं जोरदार पाऊस येईल अशी आशा होती पण पाऊस आलाच नाही. अचानक सुरु झालेल्या या सोसाट्याच्या वाऱ्यामुळं नागरिकांची धांदल उडाली. यामुळं अनेक ठिकाणी झाडं पडली तर शहरातील सिद्धार्थ उद्यानात भिंत कोसळल्यानं त्याखाली दबल्या गेल्यानं दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. पण जिल्ह्यातील पाचोड शहर तसंच पैठण इथं मात्र मुसळधार पावसाला सुरुवात झाली.