यंत्राच्या मदतीने ऊस लागवड, शेतकऱ्याचे श्रम वाचणार !

कमी वेळेत जास्त क्षेत्रात ऊस लागवडीचा प्रयोग
Sugar Cultivation Through Machine In Aurangabad
Sugar Cultivation Through Machine In Aurangabad esakal
Updated on

लोहगाव (जि.औरंगाबाद) : शेतकऱ्याचा पिक लागवडीसाठी वाढलेला शेतमजुरी खर्च कमी करण्यासाठी यांत्रिकीकरणाद्वारे कमी वेळेत जास्त क्षेत्रात ऊस लागवडीचा (Sugarcane Cultivation) प्रयोग लोहगावसह (ता.पैठण) सात गावात राबविण्यात येत आहे. यासाठी सेहगल फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. दुष्काळ स्थिती नंतर अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्ती चक्रा सोबतच शेती (Farming) उत्पादनासाठी खते, बियाणे, बेणे, व मशागत शेत मजुरीचा वाढलेल्या खर्चाने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळण्यासाठी लोहगाव, मुलानीवाडगाव, ढाकेफळ, तोडोंळी, इसारवाडी, वरूडी, बालानगर येथे सेहगल फाऊंडेशनतर्फे खरीप, रब्बी हंगामात शेद्रीय शेती, यांत्रिकीकरण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, पीक प्रात्यक्षिक, सुक्ष्म अन्नद्रव्य, हिरवा चारा पिके आदी कार्यक्रम राबविण्यात येते.(Sugarcane Cultivate Through Machine In Lohgaon Area Of Aurangabad)

Sugar Cultivation Through Machine In Aurangabad
कित्येकांचे हास्य मोदी सरकारने हिरावले - राहुल गांधी

गेल्या महिन्यांपासून निवडक पंचवीस एकर खोंडवा ऊस शेतात पाचटकुंटी, हुमनीकिड नियंत्रण, विद्राव्य खत वाटप तर पंचवीस एकर क्षेत्रात ट्रॅक्टरवरील यंत्राने एकाच वेळी ऊस लागवड खत, सरी पाडणेचा प्रयोग हाती घेत त्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना गुरूवार (ता.१७) लोहगाव व ढाकेफळचे तरूण शेतकरी कशिनाथ भवर, तुषार शिसोदे यांच्या शेतावर दाखवण्यात आले. यावेळी सेहगल फाऊंडेशनचे राज्य प्रमुख विष्णु खेडकर, प्रकल्प समन्वयक योगेश शिंगारे, शेती सहायक राजपाल सोनकांबळे, शेतकरी, विकास शिसोदे, गणेश शिदे, गणेश गवळी, जाकीर शेख, ज्ञानेश्वर शिंदे, गंगाराम भागवत, योगेश शिरवत, रामनाथ पाचे, रामनाथ भवर, सुरेश बोरूडे, गीताराम भवर, नितीन भवर, भागचंद कोरडे, कृष्णा भवर, अर्जुन जगधने,लक्ष्मण शिरवत, राहुल दळे आदी उपस्थित होते. (Aurangabad)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com