पक्ष माझ्या बापाने रक्त गाळून उभारलाय, राडेबाजांना सुप्रिया सुळेंचा दम 

Aurangabad news
Aurangabad news

पैठण (जि. औरंगाबाद) : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष माझ्या बापाने रक्त गाळून उभारलाय. पक्षाच्या शिस्तीला गालबोट लावण्याचे प्रकार मी खपवून घेणार नाही, असा सज्जड दम खासदार सुप्रिया सुळे यांनी राडेबाज कार्यकर्त्यांना भरला. 

पक्ष बांधणी व तालुक्यातील विविध योजना आणि विकास प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पैठण येथे सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. २१) कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राष्ट्रवादीचेच दत्ता गोर्डे व संजय वाघचौरे यांच्या समर्थकांनी विधानसभा निवडणुकीच्या पराभवाच्या मुद्यावरुन गोंधळ घातला. त्यामुळे सुळे चांगल्याच भडकल्या. 

सुप्रिया सुळे व्यासपीठावर आल्यानंतर चर्चेला सुरुवात करण्यात आली. एक-दोन विकासाचे प्रश्नही कार्यकर्त्यांनी मांडले. हे प्रश्न व मुद्दे मांडताना कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीतील राजकारणचा मुद्दा मांडला. यावेळी मेळाव्यातील कार्यकर्त्यांनी राजकारणाच्या मुद्यावर आक्षेप घेतला आणि गोंधळ सुरु झाला. 

आजचा हा संवाद मेळावा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पारिवारीक मेळावा असुन येथे फक्त तालुका विकास व पक्षबांधणी एवढाच विषय असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. कुणाला पदे आणि कुणाला तिकिट द्यायचे, हा माझा विषय नसून, अजितदादा पवार व जयंत पाटील यांच्या अधिकारातील विषय असल्याचे सांगत पुन्हा विकास व पक्षबांधणीवर चर्चा सुरु केली. 

परंतु पुन्हा विधानसभा निवडणुकीतील राजकारणाचा विषय उपस्थित झाल्याने दत्ता गोर्डे व संजय वाघचौरे यांच्या समर्थकांनी वादावादी सुरु केली. या वादात गोर्डेंना सत्तर हजार मतदान मिळाले. वाघचौरे असते तर एक लाख मतदान मिळाले असते, असा मुद्दा त्यांच्या समर्थकांनी काढला आणि पुन्हा वाद उसळला. 

राडेबाजांचे असे वर्तन खपवून घेणार नसल्याचा इशारा देऊन सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांचा हा संवाद मेळावा अर्ध्यावरच संपल्याचे जाहीर केले. त्यामुळे मेळाव्यात पक्ष बांधणी व तालुका विकास प्रश्नांवर चर्चा होऊच शकली नाही. 

आता फक्त मी बोलणार 

हा वादावादीचा प्रकार थांबत नसल्याचे पाहुन सुप्रिया सुळे यांनीच माईकचा ताबा घेतला. आता फक्त मी बोलणार, असे सांगुन सुळे यांनी गोर्डे व वाघचौरे यांना माझ्या आपल्या गाडीत जाऊन बसायला सांगितल्यावर कार्यकर्ते शांत झाले. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझा वडीलांनी रक्त गाळून, कष्टाने उभा केला आहे. तुमचा मान, आदर मी करते तुमच्या भावनाही मी समजु शकते; परंतु या माझ्या पक्षाला मी अशी गालबोट लागू देणार नाही, असा इशाराच यावेळी त्यांनी दिला. या हुल्लडबाजीचा अहवाल पक्षाच्या नेत्यांना देणार असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या. तसेच हा मेळाव्याचा कार्यक्रम संपल्याचे सुळे यांनीच जाहीर केले. 

पैठणची ही कटु आठवण राहील 

मी एक संवेदनशील महिला असून, कार्यकर्त्यांनी केलेली हुल्लडबाजी माझ्या मनाला लागली आहे. असा प्रसंग मी पहिल्यांदाच बघत आहे. त्यामुळे मला तुम्ही खरोखर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहात का याची शंका येते, असे त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता असे करुच शकत नाही. घडलेल्या या प्रकाराची कटु आठवण माझ्या मनात राहील, असेही सुप्रिया सुळे उद्विग्न होऊन म्हणाल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com