esakal | मराठवाड्यात २६५ तब्लिगी मरकजला जाऊन आले : दहा जणांचा अद्याप शोध सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

औरंगाबाद जिल्ह्यात १०९, जालना १२, परभणी १८, हिंगोली १६, नांदेड ३०, लातूर २६, उस्मानाबाद २६ आणि बीड २८ लोक दिल्लीच्या मरकजला गेले होते. हे सर्वजण तब्लिगी जमातचे अनुयायी आहेत. या सर्व लोकांची यादी विभागीय आयुक्त कार्यालयाने तयार केली असून, यापैकी २४७ व्यक्तींचा शोध घेण्यात आलेला आहे. उर्वरित दहा व्यक्तींचा शोध घेणे सुरू आहे.

मराठवाड्यात २६५ तब्लिगी मरकजला जाऊन आले : दहा जणांचा अद्याप शोध सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : दिल्लीच्या निजामुद्दीन मरकज येथील तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्यांची माहिती शासनाकडून घेण्यात येत आहे. मरकज येथून मराठवाड्यात २६५ भाविक परत आले आहेत. त्यांची आरोग्य तपासणी प्रत्येक जिल्ह्यात केली जात आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात १०९, जालना १२, परभणी १८, हिंगोली १६, नांदेड ३०, लातूर २६, उस्मानाबाद २६ आणि बीड २८ लोक दिल्लीच्या मरकजला गेले होते. हे सर्वजण तब्लिगी जमातचे अनुयायी आहेत.

या सर्व लोकांची यादी विभागीय आयुक्त कार्यालयाने तयार केली असून, यापैकी २४७ व्यक्तींचा शोध घेण्यात आलेला आहे. उर्वरित दहा व्यक्तींचा शोध घेणे सुरू आहे.

२४७ व्यक्तींपैकी १७० व्यक्ती या संबंधित जिल्ह्यातील असून, २० व्यक्ती या विभागातील; तसेच राज्यातील इतर जिल्ह्यातील आहेत. त्यांची माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे.

तसेच ५७ व्यक्ती या दिल्ली, उत्तरप्रदेश, पंजाब, गुजरात, आंध्रप्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, तेलंगणा, हरियाना, छत्तीसगड राज्यातील असून, त्यांची माहिती संबंधित राज्यांना देण्यात आली आहे, , अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

loading image