esakal | मराठवाड्यात ‘सन डे’, तापमान ४५ अंशावर
sakal

बोलून बातमी शोधा

Tempreture

मराठवाड्यात आठपैकी सात जिल्ह्यांत रविवारी (ता. २४) पुन्हा उष्णतेची लाट निर्माण झाली. परभणी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पारा ४५.४ अंशांवर पोचला. नांदेडचा पाराही ४५ अंशांवर होता. हिंगोली वगळता इतर जिल्ह्यातील तापमान ४१ अंशाच्या पुढे राहिले. त्यामुळे रविवार मराठवाड्यासाठी ‘सन’डे ठरला.

मराठवाड्यात ‘सन डे’, तापमान ४५ अंशावर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: मराठवाड्यात आठपैकी सात जिल्ह्यांत रविवारी (ता. २४) पुन्हा उष्णतेची लाट निर्माण झाली. परभणी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पारा ४५.४ अंशांवर पोचला. नांदेडचा पाराही ४५ अंशांवर होता. हिंगोली वगळता इतर जिल्ह्यातील तापमान ४१ अंशाच्या पुढे राहिले. त्यामुळे रविवार मराठवाड्यासाठी ‘सन’डे ठरला.

हेही वाचा- शिवसेनेच्या नाकीनऊ आणलेल्या या माजी आमदाराने राजीनामा कुठं दिला?

परभणी शहराचे तापमान गतवर्षी ता. १५ मे ६ जूनपर्यंत तापमान ४५ ते ४६ अंशांदरम्यान राहिले होते. मे महिन्याच्या सुरवातीलाच आठ दिवस तापमानात ४२ अंशांवरून पारा वाढून ४४ अंशांवर गेले होते; मात्र मध्येच ढगाळ वातावरणामुळे पारा घसरला होता. आता शनिवारपासून पारा पुन्हा चढला आहे. शनिवारी व रविवारीही पारा ४५.०४ अंशांवर होता. वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण झाले असून, सायंकाळी उशिरापर्यंत झळांचे चटके बसत आहेत. नांदेडमध्येही यावर्षीच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान रविवारी नोंदविले गेले.

क्लिक करा- घाबरू नका, तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार

आकडे बोलतात
जिल्हा           कमाल    किमान

परभणी         ४५.४     २७.५
नांदेड           ४५        २८.०
बीड             ४३.५     २८
जालना          ४३.२     २४.९
उस्मानाबाद    ४३        २५.५
औरंगाबाद     ४२.३     २८.८
लातूर           ४१        २९
हिंगोली         ३९        २८

उन्हातही खरिपाच्या कामाला वेग

‘मढे झाकूनिया करिती पेरणी, कुणबियाची वाणी लवलाहे’ तुकाराम महाराजांच्या या अभंगानुसार शेतकऱ्यांना काहीही झाले तरी वेळप्रसंगी मढे झाकूनही ठराविक कालावधीत पेरणी करावीच लागते; उन्हाची कितीही काहिली वाढली असली तरी सध्या बळीराजा खरिप हंगामाच्या तयारीत गुंतला आहे.

हे वाचंलत का? - आता पाच मिनिटांत कोरोनाचे निदान; राज्यातील पहिलाच प्रयोग