School Inspection : सहशिक्षकाचे सीईओंकडून निलंबन ; पाबळतांडा शाळेची गुणवत्ता असमाधानकारक

आडगाव सरक केंद्रांतर्गत असलेल्या पाबळतांडा शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता खराब असल्याचे आढळली. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विकास मीना यांनी त्या शाळेतील शिक्षकाचे गुरुवारी (ता.२१) निलंबन केले.
School Inspection
School Inspectionsakal

छत्रपती संभाजीनगर : आडगाव सरक केंद्रांतर्गत असलेल्या पाबळतांडा शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता खराब असल्याचे आढळली. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विकास मीना यांनी त्या शाळेतील शिक्षकाचे गुरुवारी (ता.२१) निलंबन केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) यांनी मंगळवारी (ता. १९) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाबळतांडा येथे आकस्मिक भेट दिली होती. या शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत एकूण २२ विद्यार्थी आहेत. भेटी दरम्यान सीईओंनी स्वतः शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासणी केली असता २२ पैकी फक्त एका विद्यार्थ्याला संख्या वाचन व गणितीय क्रिया करता आली.

यावरून शालेय कामकाजात अक्षम्य दुर्लक्ष व निष्काळजीपणा केल्याचे सकृत्दर्शनी निदर्शनास आले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ चे कलम ३ चा भंग करणारी असल्याने सहशिक्षक दिलीप ढाकणे यांना महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ चे नियम ३ नुसार जिल्हा परिषद सेवेतून आदेशाच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, गंगापूर येथे निश्चित करण्यात आले.

School Inspection
Dharashiv Accident News : एसटीच्या धडकेत व्यापारी जागीच ठार

निलंबन कालावधित त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वोवेत्तर सेवा, निलंबन, बडतर्फी आणि सेवेतून काढून टाकणे त्यांच्या काळातील प्रदाने) नियम १९८१ चे कलम ६८ प्रमाणे निर्वाह भत्ता अनुज्ञेय राहील, निलंबन मुख्यालयी उपस्थित असल्याचे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र असल्याशिवाय निर्वाह भत्ता अदा करण्यात येणार नाही.

निलंबन काळात पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही; तसेच या काळात शासकीय सेवेत अथवा निमशासकीय सेवेत पूर्णवेळ अथवा अर्थ वेळ नोकरी करण्याची अनुमती राहणार नाही. त्यांना मुख्यालयाच्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करावे व तशी नोंद संबंधितांच्या मूळ सेवापुस्तिकेत घेण्यात यावी, असे आदेशही मीना यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com