Dharashiv Accident News : एसटीच्या धडकेत व्यापारी जागीच ठार

लातूर - बार्शी रोडवरील नरसिंह पेट्रोल पंपावरून ढोकीचे किराणा व्यापारी दुचाकीत पेट्रोल भरून रोडवर येत असताना एसटी महामंडळाच्या बसने जोराची धडक दिली.
Dharashiv Accident News
Dharashiv Accident Newssakal

ढोकी : लातूर - बार्शी रोडवरील नरसिंह पेट्रोल पंपावरून ढोकीचे किराणा व्यापारी दुचाकीत पेट्रोल भरून रोडवर येत असताना एसटी महामंडळाच्या बसने जोराची धडक दिली. या धडकेत त्यांच्या मेंदुला जबर मार लागल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

शितल उर्फ मुन्ना जाधव (वय ५३) असे मृत किराणा व्यापाऱ्याचे नाव आहे. ही घटना गुरुवार (ता. २१) दुपारी पावणे चारच्या दरम्यान लातूर - बार्शी रोडवर घडली. राज्य परिवहन महामंडळाची लातूर - धाराशिव बस (क्रमांक एम. एच. २० बी. एल. २६३१) ने जोराची धडक दिली.

Dharashiv Accident News
Sambhaji Nagar : कॉल ड्रॉप आणि क्रॉस कनेक्शनचे छत्रपती संभाजीनगरात वाढले प्रमाण; बिले भरणारे वैतागले

जखमी अवस्थेत जाधव यांना ढोकी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्यावर ढोकीत शुक्रवारी सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, वडील, दोन भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com