esakal | CoronaBreaking:औरंगाबादेत पून्हा दोन बळी, रुग्ण @१११६, आज ४० पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

CoronaVirus News Aurangabad

औरंगाबादेत कोरोनाचा कहर सुरूच असून जयभीमनगर, टाउनहॉल येथील ५५ वर्षीय पुरुष आणि इंदिरानगर, बायजीपूरा येथील ८० वर्षीय पुरुषाचा कोरोना आणि इतर आजारामुळे मृत्यू झाला.

CoronaBreaking:औरंगाबादेत पून्हा दोन बळी, रुग्ण @१११६, आज ४० पॉझिटिव्ह

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाचा कहर सुरूच असून जयभीमनगर, टाउनहॉल येथील ५५ वर्षीय पुरुष आणि इंदिरानगर, बायजीपूरा येथील ८० वर्षीय पुरुषाचा कोरोना आणि इतर आजारामुळे मृत्यू झाला.

आतापर्यंत औरंगाबाद आतापर्यंत एकूण ३८ मृत्यू झाले आहेत. आज (ता.२०)  सकाळच्या सत्रात ४० नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे आता औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्ण संख्या १ हजार ११६ इतकी झाली आहे. औरंगाबाद शहरातील रुग्ण वाढ आणि मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ही औरंगाबादकरांसाठी धोक्याची घटना असून मराठवाड्यातही रुग्ण वाढ होत असल्याने आता अधिक सजग आणि जबाबदारी घेण्याची गरज आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

३७ वा मृत्यू
जय भीमनगर टाऊन हॉल येथील ५५ वर्षीय पुरुषाला १९ मे रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास घाटी रुग्णालयात त्यांना दम लागणे आणि जुलाबचा त्रास होता. त्यामुळे त्यांना कोविड वार्डात भरती करण्यात आले. त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ही ८७ टक्के होते. त्यांना मधुमेह हा आजार गत सहा वर्षापासून होता व त्यांची बायपास शस्त्रक्रिया २०१४ मध्ये झाली होती. त्यांना न्युमोनिया झाल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटिलेटरही लावण्यात आले होते. परंतु उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा १९ मे रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांचा कोवीड अहवाल रात्री साडेअकराच्या सुमारास पॉझिटिव्ह आला. मृत्युनंतर अहवाल येईपर्यंत त्यांचा मृत्यू घाटीतील शवागृहात ठेवण्यात आला होता.

आज ३८ वा बळी
इंदिरानगर बायजीपूरा येथील ८० वर्षीय पुरुषाला श्‍वास घेण्यासाठी दम लागत होता आणि तापही येत होती. त्यांना घाटी रुग्णालयात १४ मे रोजी सकाळी अकराच्या सुमारास अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले. तेव्हा त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण ६० टक्के होते. त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले होते. त्यांना लक्षणामुळे कोरोनाचे संशयित म्हणून भरती करण्यात आले होते.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

त्यांच्या लाळेचे नमुने ही लॅबमध्ये पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल १४ मे रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास प्राप्त झाला. त्यांना कोरोनाची लागण झाल्याची त्यातून स्पष्ट झाले. यानंतर यानंतर कोविड अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. या दरम्यान त्यांचा आज पहाटे  सहाच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांना पंधरा वर्षापासून उच्च रक्तदाब हा आजार होता. अशी माहिती घाटीतील डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली.

आज ४० रुग्ण पॉझिटिव्ह
औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळलेले रुग्ण (कंसात रुग्ण संख्या) -
 गणेश नगर, खंडोबा मंदिर, सातारा गाव (१), न्याय नगर, गल्ली नं. ७ (२), पुंडलिक नगर, गल्ली नं ७ (१) पोलिस कॉलनी (२), लिमयेवाडी, मित्र नगर (१), शरीफ कॉलनी (१), न्याय नगर, गल्ली न.१ (१), रोहिदास नगर, मुकुंदवाडी (३), मराठा गल्ली, उस्मानपुरा (२), कैलास नगर, गल्ली नं.२ ( ३) जुना मोंढा, भवानी नगर, गल्ली नं.५ (२), शिवशंकर कॉलनी, तानाजी चौक, बालाजी नगर (२), इंदिरा नगर (१), खडकेश्वर (१), माणिक नगर (१), जयभीम नगर (४), पुंडलिक नगर (५), जिल्हा सामान्य रुग्णालय (१), संजय नगर (१), सिटी चौक (१), बालाजी नगर (१), आणि फुलंब्री तालुक्यातील बाबरा, भिवसने वस्ती (२), कन्नड तालुक्यातील धनगरवाडी, औराळा (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये १५ महिला व २५ पुरुषांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

loading image