ट्रक उलटला, मदत करण्याऐवजी टोमॅटो पळविण्यासाठी नागरिकांची पळापळ

माणुसकी हरवली ! टोमॅटो घेऊन जाणाऱ्या नागारिकांना जखमी अवस्थेत ट्रकचालक मदतीसाठी विनवणी करत होता.
Aurangabad  Accident News
Aurangabad Accident Newsesakal

पाचोड (जि.औरंगाबाद) : औरंगाबादहून बीडकडे टोमॅटो घेऊन जाणारा मालवाहू ट्रकचे अचानक टायर फुटून चालकाचे भरधाव वेगावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यावर उलटला. यावेळी महामार्गावरुन ये-जा करणाऱ्या वाहनधारकांसह ग्रामस्थांनी आपापली वाहने थांबवून मदत करण्याऐवजी रस्त्यावर विखूरलेले टोमॅटोचे कॅरेट पळविण्यासाठी नागरिकांमध्ये चढाओढ लागल्याचे दृश्य पाहावयास मिळाले. दरम्यान या घटनेत नागरिकांनी पळविलेल्या टोमॅटोमुळे लोखोंचे नुकसान झाल्याची घटना औरंगाबाद (Aurangabad) -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव जावळे व दाभरूळ (ता.पैठण) शिवारात सोमवारी (ता.२३) सकाळी घडली. (Truck Accident, People Looted Tomatoes Instead Of Helping Injured Driver In Aurangabad)

Aurangabad  Accident News
पैसे देऊन लोकांना मोर्चाला आणले, अंबादास दानवेंचा भाजपवर आरोप

अधिक माहीती अशी की, औरंगाबादहून बीडकडे (Beed) टोमॅटोने भरलेला भरधाव वेगातील ट्रकचे (आरजी ११ जीबी ९३४३) टायर फुटुन अचानक दाभरुळ पेट्रोलपंपाजवळ चालकाचे स्टेरिंगवरील नियंत्रण सुटुन काही समजण्याच्या आतच तो रस्त्यावर उलटला. त्यामुळे ट्रकमधील कॅरेटमध्ये गच्च भरलेले टोमॅटो रस्त्यावर विखुरले गेले. या अपघातामध्ये ट्रकचालक व किल्नर गंभीर जखमी झाले होते. पण त्याला मदत करण्याऐवजी महामार्गावर येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनी टोमॅटो लुटायला सुरुवात केली. ही बातमी काही क्षणाताच परिसरात वाऱ्यासारखी पसरली अन् आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची तिथे एकच गर्दी उसळली. ज्याला जेवढे मिळेल तेवढे आणि जमेल तितकी टोमॅटोची कॅरेट घेऊन नागरिक तिथून पसार झाली. काही बहाद्दरांनी तर टोमॅटो नेण्यासाठी मोठ-मोठ्या खताच्या गोण्याही आणल्या होत्या. तर काहींनी तर चक्क अंगावरील शर्ट बनियन काढून, काहींनी मोटारसायकलच्या डिक्कीत टोमॅटो भरून नेल्याने बघता-बघता भरगच्च ट्रक अगदी रिकामा झाला.

Aurangabad  Accident News
Aurangabad | धक्कादायक ! औरंगाबादेत पती-पत्नीचा निर्घृण खून, मुलगा फरार

अन् मदतीऐवजी टोमॅटो घेऊन नागरिक गायब झाली. टोमॅटोची लयलुट करण्यासाठी लहान मुले महिलाही मागे राहिली नाही. त्यांनीही साडीच्या पदरात भरुन टोमॅटो लंपास केली. विशेष म्हणजे आपल्या डोळ्यांदेखत टोमॅटो घेऊन जाणाऱ्या नागारिकांना जखमी अवस्थेत ट्रकचालक मदतीसाठी विनवणी करत होता. परंतु टोमॅटो लुटणाऱ्या लोकांनी ना त्याला मदत केली ना त्याच्या विनवणीकडे लक्ष दिलं. त्यामुळे लाखो रुपयांचं टोमॅटो क्षणार्धात रिकामे झाले, तर रस्त्यावर अनेक टोमॅटो फुटल्याने व नागरिकांच्या उडालेल्या झुंबडाच्या पाया खाली दबून टोमॅटोचा घटनास्थळी लाल चिखल झाल्याचे दिसले. या घटनेत लाखो रुपयांची नुकसान झाल्याने ट्रकचालकाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. मात्र नुकसानीपेक्षा माणुसकी लुप्त झाल्याचे त्यास फार दुःख झाल्याचे त्याने सांगितले. काही वेळाने पाचोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावरील आडवा ट्रक क्रेनच्या साहाय्याने सरळ करुन वाहतुक सुरळीत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com