esakal | संतापजनक : लाॅकडाऊन!! अन पोलिसांना दोघे अचानक दिसले, पाठलाग करताच....
sakal

बोलून बातमी शोधा

arrest

तलवार घेऊन फिरणाऱ्या दुचाकीवरील दोघांना करमाड पोलिसांनी गजाआड केले. ही कारवाई १३ मे रोजी पहाटेच्या सुमारास कुंभेफळ रेल्वे फाटकाजवळ करण्यात आली. रामेश्‍वर सुदामराव मोरे (वय २६) व संतोष गुलाबराव मोरे (वय ४३, दोघे रा. नायगव्हाण ता. जि. औरंगाबाद) अशी त्या आरोपींची नावे आहेत.

संतापजनक : लाॅकडाऊन!! अन पोलिसांना दोघे अचानक दिसले, पाठलाग करताच....

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरगाबाद : तलवार घेऊन फिरणाऱ्या दुचाकीवरील दोघांना करमाड पोलिसांनी गजाआड केले. ही कारवाई १३ मे रोजी पहाटेच्या सुमारास कुंभेफळ रेल्वे फाटकाजवळ करण्यात आली. रामेश्‍वर सुदामराव मोरे (वय २६) व संतोष गुलाबराव मोरे (वय ४३, दोघे रा. नायगव्हाण ता. जि. औरंगाबाद) अशी त्या आरोपींची नावे आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

प्रकरणात करमाड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सशांत सुतळे (३५) यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार, १२ मे रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास सुतळे व त्यांचे सहकारी हद्दीत गस्त घालत होते. पहाटे सव्वा दोन वाजेच्या सुमारास कुंभेफळ रेल्वे फाटकाजवळ कुंभेफळ गावातून आरोपी रामेश्र्वर मोरे व संतोष मोरे हे दोघे दुचाकीवर (क्रं.एमएच २०,ई.ए. ८८७४) येतांना दिसले.

आरोपींनी पोलिसांची जीप पाहून आपली दुचाकी पुन्हा गावाकडे वळविली. त्यामुळे पोलिसांना त्यांचा सशंय आला. पोलिसांनी दोघांना थांबण्याचा इशारा देत त्यांची झडती घेतली असता आरोपी संतोष मोरे याच्याकडे लोखंडी तलवार सापडली.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

पोलिसांनी तलवारसह दूचाकी जप्त करुन दोघा आरोपींविरोधात करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान दोघा आरोपींना बुधवारी (ता. १३) न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. यू. न्याहरकर यांनी दोघा आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.

loading image
go to top