औरंगाबादकरांना थोडा दिलासा, 292 अहवाल निगेटिव्ह

CoronaVIrus
CoronaVIrus

औरंगाबाद : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना थोडा दिलासा देणारी बातमी आली आहे. संशयित आणि संपर्कातील २९२ अहवाल शुक्रवारी (ता.१)  निगेटिव्ह आले आहेत. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.

गत पाच दिवसात तब्बल १२४ रुग्ण पॉझिटिव्ह आले.  गुरुवारी (ता. ३०) तर ४७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. औरंगाबादची बाधितांची संख्या, १७७ झाल्याने चिंता वाढत असताना शुक्रवारी सांयकाळपर्यंत एकही रुग्ण पॉझिटिव्ह आला नाही. विशेष म्हणजे शुक्रवारी सकाळपासून २१६ लाळेच्या नमुण्याची तपासणी झाली.

त्यात महापालिकेच्या १८५ तर जिल्हा रुग्णालयातील ३१नमुन्यांचा समावेश होता हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले.  तसेच आणखी ७६ स्वब निगेटिव्ह आले. त्यात जिल्हा रुग्णालयातील ५५, महापालिकेकडून आलेले १९ आणि घाटी रुग्णालयातील दोघांच्या नमुन्यांचा समावेश आहे.

आठवा बळी, ४७ वर्षीय वाहनचालकाचा मृत्यू

औरंगाबाद शहरात कोविड -१९ विषाणूचे  संकट आणखी गडद होतानाच कोरोनामुळे आठवा बळी गेला.  गुरुदत्तनगर, गारखेडा परिसरात राहणाऱ्या ४७ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती घाटी रुग्णालयातील डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली.
‌४७ वर्षीय वाहनचालक असलेला रुग्ण गुरुदत्तनगर येथे राहत होता. त्याला सात दिवसांपासून ताप, कोरडा खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होता. कोविडची लक्षणे समजून त्याच्या लाळेचे नमुने घेण्यात आले होते.  तो पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला घाटीच्या  कोविड रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याला न्यूमोनिया झाला होता हे त्याचा काढण्यात आलेल्या एक्सरेवरुन स्पष्ट झाले. त्याला कृत्रिम ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. आज (ता. १) पहाटे साडे सहाच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.  प्लुमोनरी एम्बोलीजम सेकंडरी टू कोविड -१९ असोसिएटेड कोगूलोपॅथी विथ बॅक्टेरिअल प्लुमोनिया विथ अक्यूट रेस्पायरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम या कारणाने चालकाचा मृत्यू झाला.

आतापर्यंत झालेले मृत्यू
५ एप्रिल सातारा परिसरातील ५८ वर्षीय बँक व्यवस्थापकाचा मृत्यू
१४ एप्रिलला आरेफ कॉलनीतील ६८ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू
१८ एप्रिलला बिस्मिल्ला कॉलनीतील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू
२१ एप्रिलला भावसिंगपुरा येथील ७६ वर्षीय महिलेचा मृत्यू
२२ एप्रिलला आरेफ कॉलनीतील ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू.
२८ एप्रिलला किलेअर्क येथील महिलेचा मृत्यू
१ मे  गुरुदत्तनगर, गारखेडा येथील ४७ वर्षीय वाहनचालकाचा मृत्यू

उपचार घेत असलेले रुग्ण - १४७
बरे झालेले रुग्ण            - २३
मृत्यू झालेले रुग्ण          - ०७
एकूण                      - १७७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com