दोन वर्षांच्या चिमुरड्या अर्णवने कोरोनाला हरविले

बाळाची प्रकृती गंभीर झाल्याने त्याच्या आई व मामास औरंगाबाद किंवा हैदराबाद येथे जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
अहमदपूर (जि.लातूर) : पंधरा दिवस कोरोनाशी लढाई लढून घरी परताना अर्णव जाधव.
अहमदपूर (जि.लातूर) : पंधरा दिवस कोरोनाशी लढाई लढून घरी परताना अर्णव जाधव.

अहमदपूर (जि.लातूर) : डॉक्टरांना आपणास होणारा त्रास सांगू न शकणाऱ्या दोन वर्षाच्या बालकाने (Child Infected Corona) पंधरा दिवस झुंज देत कोरोनाशी (Corona) दोन हात करून कोरोनावर मात केली आहे. अर्णव गजानन जाधव (शिवाजीनगर तांडा, ता. लोहा) असे या बालकाचे नाव आहे. भाग्यश्री गजानन जाधव (शिवाजीनगर तांडा) या मुलगा अर्णव (वय दोन) यास घेऊन अहमदपूर (Ahmedpur) तालुक्यातील वरवंटी येथे त्यांचा भाऊ विकास राठोड यांच्याकडे राहण्यासाठी २८ एप्रिल रोजी गेल्या होत्या. दरम्यान ३० एप्रिल रोजी अर्णवला ताप आली. उपचारासाठी (Latur) अहमदपूर येथील खासगी रूग्णालयात दाखल केले. दोन दिवसानंतरही (Children In Corona Situation) बाळाची ताप कमी होत नसल्याने चाचणी केली असता अहवालात सी.आर. पीची बऱ्याच पटीने वाढ झाल्याचे निष्पन्न झाले.(Two Years Child Cured of Corona In Ahmedpur Latur)

अहमदपूर (जि.लातूर) : पंधरा दिवस कोरोनाशी लढाई लढून घरी परताना अर्णव जाधव.
'या' गोष्टी पाळल्या तरच कोरोनाची तिसरी लाट सौम्य असेल

डॉक्टरांनी अर्णवचा आजार वाढल्याने त्याची आई व मामा यांना अधिक सुविधा असलेल्या दवाखान्यात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. पुढे लोहा, नांदेड (Nanded) या ठिकाणी खासगी रूग्णालयात दाखल करूनही अर्णवचा सततचा जुलाब व उलटीचा त्रास थांबला नसल्याने नांदेड येथील खासगी रूग्णालयात त्याची कोरोना चाचणी केली, यात त्याला कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. बाळाची प्रकृती गंभीर झाल्याने त्याच्या आई व मामास औरंगाबाद (Aurangabad) किंवा हैदराबाद (Hyderabad) येथे जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. अर्णवला औरंगाबाद येथील खासगी रूग्णालयात इलाजासाठी दाखल करण्यात आले. १८ मे रोजी अर्णव हा कोरोना संसर्गातून पूर्णपणे बरा झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com