बेरोजगारीचा 'फास'; नोकरी न मिळाल्याने उच्चशिक्षित तरुणाची आत्महत्या

उच्च शिक्षण घेतल्यानंतर रोजगाराचा शोध घेतला, मात्र नोकरी मिळाली नाही
unemployment Not getting a job Suicide of a highly educated youth
unemployment Not getting a job Suicide of a highly educated youth

औरंगाबाद : उच्च शिक्षण घेतल्यानंतर रोजगाराचा शोध घेतला, मात्र नोकरी मिळाली नाही. यातून नैराश्य आल्याने ४२ वर्षीय उच्चशिक्षिताने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता.२९) सकाळी अकरा वाजता आरेफ कॉलनीत उघडकीस आली. मोहम्मद जियाउद्दिन चिश्ती (४२, रा. अरेफ कॉलनी) असे गळफास घेतलेल्या उच्चशिक्षिताचे नाव आहे.

मोहम्मद हे उच्चशिक्षित होते. त्यांनी एमएससी, बीएडपर्यंत शिक्षण पूर्ण झाले होते. शिक्षक पदासाठी त्यांनी अर्जही केले, परंतू कुठे नोकरी मिळाली नाही. काही दिवसांपासून त्यांनी आरेफ कॉलनीत लहान मुलांच्या शिकवण्या सुरु केल्या होत्या.

विशेष म्हणजे नोकरी मिळेपर्यंत लग्न करणार नाही असेही त्यांनी कुटूंबियांना सांगितले होते. दररोज ठराविक वेळेत उठणारे मोहम्मद खोलीबाहेर आलेच नाहीत. त्यामुळे त्यांची आई त्यांच्यासाठी जेवण वाढून गेल्या असता, आतून प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान मोठ्या भावाने खिडकीतून डोकावून बघितले असता मोहम्मद यांनी गळफास घेतल्याचे दिसले. पोलिसांच्या मदतीने मोहम्मद यांना घाटीत दाखल करण्यात आले असता, डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले. बेगमपुरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com