

EC postpones voting on two Vaijapur municipal wards after court verdicts
Sakal
वैजापूर : निवडणूक आयोगाने शनिवारी दिलेल्या सुचनेमुळे शहरातील "त्या" दोन जागांवरील निवडणुकीला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे. त्या दोन जागेसाठी 2 डिसेंबर ऐवजी आता 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान नव्या प्रक्रियेत उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याची संधी देण्यात आली आहे. वैजापूर नगर परिषद निवडणुकीच्या छाननीत शहरातील प्रभाग 1 अ मधील सुमैय्या परवीन सोहेल बक्ष व प्रभाग दोन ब मधील संदीप बोर्डे यांच्या अर्जावर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी हरकत घेतली होती. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ती अमान्य करत या दोघांचे अर्ज वैध ठरवले होते.