Vaijapur: पंचायत समितीतच नागरिकांची होतेय पंचाईत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंचायत समिती

वैजापूर : पंचायत समितीतच नागरिकांची होतेय पंचाईत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वैजापूर : नवीन अधिकारी आले की, आपण किती कडक अन् शिस्तीचे आहोत हे दाखवून देण्यासाठी रुबाब दाखवतात. सर्वसामान्यांना साहेबांचा किती वचक आहे हे दिसते. त्यानंतर ही परिस्थिती निवळते. अशीच काही अवस्था वैजापूरच्या पंचायत समितीतील मोकाट कारभाराची झाली असून तिथे कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. पंचायत समितीत शिवसेना व राष्ट्रवादी या दोन राजकीय पक्षाची सत्ता असून महत्त्वाच्या व संबंधित प्रश्नांसाठी अनेक गावकरी कामानिमित्त येतात. मात्र,

सभापती व उपसभापती हे दोन्ही महिला पदाधिकारी असल्याने त्यांच्या खुर्चीवर पतीराजांचे अधिकार अधिक चालत असल्याने तक्रारी व समस्या वाढत आहेत. शासकीय कार्यालयांची वेळ सकाळी ९.४५ ते ५.४५ अशी करण्यात आली आहे. मात्र पंचायत समितीत शासकीय कामकाज ११ वाजेनंतर सुरू होते. चार वाजता सर्व कर्मचाऱ्यांना घरी जाण्याचे वेध लागलेले दिसते. बहुतांश अधिकारी व कर्मचारी औरंगाबाद येथून ये-जा करतात.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

त्यामुळे सर्व लेटलतिफशाही सुरू आहे. विशेष म्हणजे यावर नियंत्रण ठेवणारे गटविकास अधिकारी देखील स्वतःच औरंगाबादवरून ये-जा करीत असल्यामुळे त्यांचे अधीनस्त कर्मचाऱ्यांवर कोणतेही नियंत्रण उरलेले नाही. कार्यालयीन वेळेतही अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या ओस पडलेल्या दिसतात. इतकेच काय तर बाहेरून येणाऱ्या जनतेला साधे पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. मागील एक वर्षापासून पंचायत समितीचे फिल्टर बंद पडले आहे. घरकुल लाभार्थी यादी बनवताना चुका झाल्यामुळे चार महिन्यांपासून बँकेत अनुदान जमा न झाल्याने तालुक्यात घरकुलचे काम ठप्प आहे. ग्रामीण भागात चौदाव्या वित्त आयोगाच्या शेवटचा हप्ता व पंधराव्या वित्त आयोगातील पहिला हप्त्यातून झालेल्या कामाची व दर्जाची तपासणी होणे आवश्यक आहे.

साहेब... लक्ष द्या..!

वैजापूर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी एक नियमावली बनवली आहे, ती म्हणजे आठवड्यातून केवळ आठवडे बाजाराच्या दिवशीच हजर राहून काम करण्याची सवय! त्यामुळे सोमवारी आठवडे बाजाराच्या निमित्ताने नागरिक शासकीय कामांसाठी येत असले तरी या दिवशी नागरिकांची गर्दी जास्त प्रमाणात येत असल्याने कामांचा निपटारा न होता जास्तीत जास्त कामे प्रलंबित राहतात. कामाचा निपटारा करण्यासाठी कार्यालय प्रमुखांनी आठवडाभर सातत्याने कार्यालयात हजर राहणे गरजेचे आहे.

हेही वाचा: ममतांचे आमंत्रण मोदींनी स्वीकारले

रेल्वेच्या वेळापत्रकानुसार दिनचर्या

येथील कर्मचारी कार्यालयीन वेळेपेक्षा रेल्वेच्या वेळा पत्रकानुसार आपली दिनचर्या ठरवतात. त्यामुळे पंचायत समितीचा कारभार ‘आओ जाओ घर तुम्हारा’ यानुसार सुरू आहे. त्यांच्यावर ना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक आहे ना स्थानिक लोकप्रतिनिधींचा. अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे तालुक्यातील नागरिक नाहकपणे वेठीस धरले जात आहेत.

loading image
go to top