वाळूज एमआयडीसी पोलिस हद्दीत पथसंचलन । Aurangabad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद : वाळूज एमआयडीसी पोलिस हद्दीत पथसंचलन

औरंगाबाद : वाळूज एमआयडीसी पोलिस हद्दीत पथसंचलन

वाळूजमहानगर : वाळूज एमआयडीसी पोलिस हद्दीत कायदा व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रॅपीड ऍक्शन फोर्स व पोलिस ठाणे एमआयडीसी वाळूजचे अधिकारी व आंमलदार यांनी रविवारी (ता.२८) रोजी हद्दीतील विविध ठिकाणी पथसंचलन केले.

या पथकाने बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौक, रांजणगाव फाटा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कमळापूर फाटा, ग्रामपंचायत कार्यालय रांजणगाव, एकतानगर पेट्रोल पंप, आकार टूल्स, बजाजनगर, कोलगेट चौक, जयभवानी चौक, आम्रपाली बुद्ध विहार, हायटेक कॉलेज बजाज नगर, वडगाव कोल्हाटी, मोहटा देवी चौक, मोरे चौक, ओयासिस चौक, पंढरपूर भागात पथसंचलन केले.

या पथसंचलनास रॅपीड ॲक्शन फोर्सचे १ पोलिस निरिक्षक, २ पोलिस उपनिरीक्षक व ४७ अंमलदार व पोलिस ठाणे एमआयडीसी वाळूज येथील १ सहाय्यक पोलिस निरिक्षक, ३ पो.उप.नि. व १५ अंमलदार असे ढाल, लाठी हेल्मेट व इतर आवश्यक साहित्य तसेच पोलिस आयुक्त कार्यालय येथील क्युआरटी पथक, वज्र वाहन, ॲम्ब्युलन्स, वरुण वाहन व इतर वाहनांचा समावेश होता.

टॅग्स :Waluj MidcpoliceWalking