esakal | ज्याप्रमाणे निजामाशी लढलो, तसेच कोविडसोबत लढू - उद्धव ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

उद्धव ठाकरे

ज्याप्रमाणे निजामाशी लढलो, तसेच कोविडसोबत लढू - उद्धव ठाकरे

sakal_logo
By
गणेश पिटेकर

औरंगाबाद - ज्या प्रमाणे निजामाशी लढलो, तसेच कोविडसोबत लढू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मराठवाड्यातील जनतेला उद्देशाने सांगितले. आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी (Marathwada Freedom Day) औरंगाबादेतील सिद्धार्थ उद्यानात मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम ठाकरे यांच्या हस्ते झाला. त्यानंतर ते बोलत होते. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे मराठवाड्यात विकास होईल. परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु केले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. हे सरकार कागदावर घोषणा करणारे नाही. ते जमिनीवर आणणारे आहे.

हेही वाचा: औरंगाबादेत एमआयएमचे उपरोधिक आंदोलन सुरु

घृष्णेश्वर मंदिराच्या सभामंडपाचे वेगळ्या प्रकारे बांधकाम करतोय. मंदिरे उघडा, त्यात जावेसे वाटले पाहिजे. मंदिरे स्वच्छ, सुंदर करणार आहोत. कोविड आटोक्यात आणले, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

loading image
go to top