Aurangabad : धक्कादायक ! औरंगाबाद पोलिस आयुक्तालयासमोर महिलेने घेतले पेटवून

औरंगाबादमधील धक्कादायक घटना, महिलेला घाटीत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Aurangabad Police Commissioner
Aurangabad Police Commissioneresakal

औरंगाबाद : ३५ वर्षीय महिलेने औरंगाबाद (Aurangabad) येथील पोलीस आयुक्तालयासमोर पेटवून घेतल्याची घटना घडली. ही खळबळजनक घटना आज गुरुवारी (ता.एक) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वाराजवळ घडला. दरम्यान पोलिसांनी तात्काळ धाव घेत महिलेच्या अंगावर कपडे टाकले.

Aurangabad Police Commissioner
Aurangabad : आंध्रातील विद्यापीठाच्या नावाचा चेक देऊन १० लाखांना चुना

दरम्यान दामिनी पथकाने तात्काळ महिलेला घाटी रुग्णालयात दाखल केले. पेटवून घेतलेल्या महिलेचे नाव सविता दीपक काळे (वय ३५ वर्ष, रा. मांडवा, गंगापूर) आहे. पेटवून घेतलेल्या महिलेचे छाती,पोट, हात, पाय भाजले असून तिच्यावर घाटी रुग्णालयात जळीत कक्ष उपचार सुरू आहेत.

Aurangabad Police Commissioner
Crime Update : नराधम चालकाकडून दोघा अल्पवयीन मुलींवर अत्याचार

मात्र महिलेने जाळून घेण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. विशेष म्हणजे महिलेसोबत कोणीही नातेवाईक नसल्याने पोलिसांना जबाब घेण्यास अडचण येत होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com