बजाजनगर - कंपनीतील मित्रांसोबत किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीत कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली. चंद्रमणी साहेबराव कांबळे (वय ३०, रा. आडूळ, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली, सध्या रा. कृष्णानगर, रांजणगाव) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी लक्ष्मण वाडेकर यास पोलिसांनी अटक केली आहे.