दुचाकीवर तरुणीबरोबर अश्लील चाळे, अखेर 'रोमिओ' पोलिसांच्या तावडीत | Aurangabad Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Crime News

दुचाकीवर तरुणीबरोबर अश्लील चाळे, अखेर 'रोमिओ' पोलिसांच्या तावडीत

औरंगाबाद : कायम वर्दळ असलेल्या जालना रस्त्यावर मैत्रिणीला दुचाकीच्या पेट्रोलच्या टाकीवर उलटे बसवून तिचे चुंबन घेत अश्लील स्टंट करणाऱ्या रोमिओला जिन्सी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सूरज गौतम कांबळे (२४ रा. अलोकनगर, प्रशांत हॉटेलच्या पाठीमागे बीड बायपास) असे त्या संशयिताचे नाव आहे. विशेष म्हणजे, त्याने केलेल्या स्टंटचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिन्सी पोलिसांनी (Aurangabad) अटक केली. या प्रकरणी प्राप्त माहितीनुसार, सूरज कांबळे आणि त्याच्या मित्रांमध्ये मैत्रिणीला ‘तडप’ चित्रपटातील स्टंटनुसार दुचाकीच्या पेट्रोल टाकीवर बसवून वेगात दुचाकी चालवत एकमेकांना चुंबन घेण्याची पैज लागली होती.(Youth Arrested For Unethical Behaiour With Girl In Aurangabad)

हेही वाचा: काँग्रेस भाजपला घाबरली, PM मोदींच्या सुरक्षेवरुन प्रवीण दरेकरांची टीका

ही पैज सूरजने स्वीकारत तसा स्टंट केला होता. जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार सूरज आणि त्याची मैत्रीण असे दोघे ३१ डिसेंबरच्या रात्री साडेनऊ ते दहा दरम्यान दुचाकीवर एकमेकांचे चुंबन घेत बाइक रायडिंग केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ क्रांती चौक ते सेव्हन हिल आणि पुन्हा सेव्हन हिल ते क्रांती चौकपर्यंत या दरम्यान केला होता. हा व्हिडिओ त्याच्या ओळखीतीलच एकाने कारमध्ये बसून शूट केल्याची चर्चा पोलिस वर्तुळात सुरू होती. मात्र व्हिडिओ शूट करणारा कोण आहे, हे मात्र संशयित आरोपी रोमिओने (Crime In Aurangabad) पोलिसांना सांगितले नसल्याने व्हिडिओ शूट करणाऱ्याला तूर्तास तरी सहआरोपी करण्यात आलेले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा: मंत्री शंकरराव गडाख-घुले झाले व्याही-व्याही, उदयन व निवेदिता यांचा साखरपुडा

काय करतो सूरज?

या प्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित हा सूतगिरणी परिसरात एका कपड्याच्या दुकानात काम करतो. मित्रांमध्ये पैज लागल्यावरून त्याने हा स्टंट केल्याचे पोलिसांना सांगितले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिन्सी पोलिसांनी सदर प्रियकराचा शोध घेतला असता, तो अपेक्स हॉस्पिटल येथे असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस उपनिरीक्षक अनंता तांगडे, संतोष बमनत, जगताप, बाविस्कर यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात भरधाव वेगाने, निष्काळजीपणे दुचाकी चालवत स्वतःच्या व इतरांच्या जिवाला धोका निर्माण होईल, असे कृत्य केल्याचा तसेच सार्वजनिक रस्त्यावर इतरांना त्रास होईल अशा प्रकारे मैत्रिणीचे चुंबन घेऊन अश्लील वर्तन करताना सापडल्याने गुन्हा दाखल केल्याचे निरीक्षक केंद्रे यांनी सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Aurangabad Crime
loading image
go to top