

Two Killed in Golwadi Road Accident After Rickshaw Rams Into Pickup Vehicle
Sakal
बजाजनगर: आई बसलेल्या रिक्षाच्या मागे-मागे दुचाकीने मुलगा येत होता. रस्त्यात पंक्चर झाल्याने उभ्या केलेल्या पिकअप व्हॅनला मागून भरधाव वेगात निघालेली रिक्षा धडकली. रिक्षातील चौघे गंभीर जखमी झाले. मागून येणाऱ्या मुलाने आईला मांडीवर घेतले. ‘आई, ये आई गंऽऽ ऊठ ना, डोळे झाकू नको गंऽऽ असे रडत रडत तो धीर देत होता. सोबतच येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक वाहनधारकासमोर ‘थांबा, यांना दवाखान्यात न्या’, अशी याचनाही करत होता. परंतु, कुणीही थांबले नाही. रुग्णवाहिकाही तासाभराने आली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. ही घटना अहिल्यानगर रोडवरील गोलवाडी परिसरात मंगळवारी (ता.तीन) मध्यरात्रीनंतर तीनच्या सुमारास घडली.