esakal | लाॅकडाऊनमधील टाळा सायबर गुन्हे
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

बहुतांशी काम आॅनलाईन करणे अनिवार्य झाल्याने वर्क फ्राॅम होम चालु आहे. त्यासाठी इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. नेमका त्याचा गैरफायदा सायबर गुन्हेगारांनी घेतला असल्याचे दिसुन येत आहे. 

लाॅकडाऊनमधील टाळा सायबर गुन्हे

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : सध्या पुर्ण जग हे कोविड-19 सारख्या महामारीचा मुकाबला करीत आहे. विषाणुचा संसर्ग ‘ब्रेक द चेन’ या माध्यमातुन रोखण्यासाठी देशात लाॅकडाऊन पुकारला गेला आहे. त्यामुळे बहुतांशी काम आॅनलाईन करणे अनिवार्य झाल्याने वर्क फ्राॅम होम चालु आहे. त्यासाठी इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. नेमका त्याचा गैरफायदा सायबर गुन्हेगारांनी घेतला असल्याचे दिसुन येत आहे. 

कोरोना व्हायरस संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीने सायबर गुन्हे केले जात आहेत. त्याबद्दल आपण सर्वजण जागरुक राहणे आवश्यक आहे. सायबर गुन्हेगारांनी याकरिता फिशींग वेबसाईटस, मालवेअर अॅप्लीकेशन्स, फ्राॅड काॅल्स मॅसेजेस, स्पॅम्स, फेक मॅलिशिअस लिंक्स, स्कॅमिंग अशा पद्धतीच्या दुर्भावनायुक्त तंत्रप्रणालीचा अवलंब केला असल्याचे दिसुन येत आहे.   

फेक कोरोना वेबसाईट्स

coronavirus-map[.]com
coronavirus-realtime[.]com,  survivecoronavirus[.]org
vaccine-coronavirus[.]com
coronavirus[.]cc
bestcoronavirusprotect[.]tk
coronavirusupdate[.]tk
चुकीच्या लिंक्स पाठवुन त्यावर युझर्सला लाॅगीन करावयास भाग पाडले जात आहेत. त्याव्दारे युझर्सची इ- मेल आयडी, पासवर्ड चोरी करुन त्याला संलग्न असलेली गोपनिय माहिती हस्तगत केल्यानंतर फसवणुकीचे आर्थिक व्यवहार संपन्न केले जात आहेत. कोरोना व्हायरस संर्दभात अपडेट मिळविण्याकरिता बनावट कोरोना व्हायरस मॅप्सद्वारे युझर्सला एखादे अॅप्लीकेशन इन्स्टाॅल करण्यासाठी भाग पाडुन बायनरी फाईल्स वापरकर्त्याच्या मोबाईल किंवा डिव्हाईसमध्ये इन्सर्ट केले जात आहेत. त्याआधारे डिव्हाईसमधील माहीती चोरुन आॅनलाईन गैरव्यव्हार केले जाऊ शकतात. रिमोट लोकेशन तसेच डार्कवेबचा आधार घेऊन हॅकर्स हे गुन्हे करीत आहेत. फिशींग बरोबर खोट्या अफवा, खोट्या बातम्या, भडकाऊ भाषण, समाजाची शांतता एकोपा भंग करुन दोन धर्मात तेढ निर्माण करण्यासाठी भडकाऊ मजकुर, एखाद्या धर्माविषयी फेसबुक, इन्स्टाग्राम, टिक- टाॅक व्हीडीओ, टेलिग्रामव्दारे अपप्रचार चालविण्याचे प्रकारही या गुन्हेगारांकडुन होत आहेत. 

हेही वाचानायगाव तालुक्यात अवैध दारुचा महापूर

नागरिकांनी अफवा पसरवु नये

त्यांच्यावर भादंवीच्या कलम 505 (2), सहकलम कलम 52 राष्टीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 यासारखे कलमाअंर्तगत गून्हे नोंद होऊ शकतात. यासंर्दभात नागरिकांनी अफवा पसरविणाऱ्या लोकांच्या तक्रारी स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये किंवा www.cybercrime.gov.in यावर नोंद कराव्यात. कोविड -19 बाबत सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी 14 मार्च रोजीची "The Maharashtra CO VID- 19 Regulations 2020" ही अधिसूचना जाहीर केलेली आहे. त्यानुसार कोणतीही व्यक्ती/संस्था कोरोना विषाणू COVID-19 बाबत खोट्या बातम्या किंवा अफवा पसरवताना आढळल्यास त्यांना साथरोग प्रतिबंध कायदा, 1897" च्या कलम 03 अन्वये नमूद केल्याप्रमाणे जबाबदार धरले जाईल. असे कृत्य भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 अन्वये दंडनीय अपराध असल्याचे समजले जाणार आहे. कोरोना या विषाणूजन्य आजाराबद्दल सोशल मिडियातून अफवा पसरविणाऱ्यांवर कलम 505 आणि 269, 270 अंतर्गत गुन्हे दाखल केले जात आहेत.

आॅनलाईन भरण्यासाठी ग्राहकांना स्कॅमिंगची आधारे लुटले जाऊ शकते

याचबरोबर व्हिशिंग/ व्हाॅईस काॅल फोनद्वारे बॅकेचा अधिकारी बोलतोय असे भासवुन ग्राहकास EMI आॅनलाईन भरा व अमुक एखाद्या लिंकवर बँक डिटेल्स, क्रेडिट कार्डची माहिती भरा असे कळविले जाते. संबंधित संवेदनशील डाटा चोरुन नेटबँकिंगच्या माध्यमातुन फसवणुक केली जाते. वेगवेगळे विमा (insurance) चे हफ्ते आॅनलाईन भरण्यासाठी ग्राहकांना स्कॅमिंगची आधारे लुटले जाऊ शकते. कोरोना मदत म्हणुन तुमच्या खात्यात पैसे जमा करुन घेण्यासाठी किंवा कोरोनाग्रस्तांसाठी आर्थिक मदत करण्यासाठी अमुक एखाद्या लिंकवर बँक डिटेल्सची माहिती अपडेट करावी अशा फ्राॅड लिंक्सद्वारे फसवणुक केली जात आहे. मोबाईल आॅनलाईन रिचार्ज करण्यासाठी किंवा अधिक इंटरनेट डाटा मिळविण्याकरिता अमुक एखाद्या लिंकवर क्लिक करा असे भासवुन सायबर फ्राॅड केले जात आहेत.

येथे क्लिक कराVideo - नांदेडला महामानवाला अभिवादन पण घरी राहूनच...
 
व्हाटसअॅप ग्रुपच्या अॅडमिन्सवर सर्व ग्रुपमधील सदस्यांच्या हालचालींवर लक्ष

अशा सर्व प्रकारचे सायबर गुन्हे करणार्‍यांवर भारतीय दंड संहितेतील कलम 153 अ आणि ब, 295 अ, 505, 188 माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 66 क आणि ड, आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील कलम 54 मुंबई पोलीस कायद्यातील कलम 68 आणि फौजदारी दंड संहितेतील कलम 144 अन्वये गुन्हा नोंद होउ शकतो. महत्वाचे व्हाटसअॅप ग्रुपच्या अॅडमिन्सवर सर्व ग्रुपमधील सदस्यांच्या हालचालींवर, त्यांनी पोस्ट करत असलेल्या साहित्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारीही वाढविण्यात आली असुन एक संदेश एकावेळी एकाच व्यक्तीला सेंड करण्याची तरतुदही व्हाटसअॅपने केली आहे. यामुळे बरीच माहिती व्हायरल करण्यापासुन टाळता येणार आहे. 
-आवेज मक्सुदअहेमद काझी 
(पोलीस फौजदार,लातुर, मो.9763901000, मेल:awezkazi@gmail.com)