बासंबा पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा, एक लाख नव्वद हजाराचा ऐवज जप्त

पोलिसांनी घटनास्थळावरुन ४० हजार रुपये रोख व सहा दुचाकी, जुगाराचे साहित्य असा एक लाख ९० हजाराचा ऐवज जप्त केला आहे.
बासंबा पोलिसांची जुगार अड्ड्यावर कारवाई
बासंबा पोलिसांची जुगार अड्ड्यावर कारवाई

हिंगोली : तालुक्यातील बासंबा पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या पेडगाववाडी शिवारात एका शेतात सुरु असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एक लाख ९० हजार रुपयांचा ऐवज शनिवारी (ता. १२) जप्त केला. यावेळी सहा दुचाकी जप्त करुन १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पेडगाववाडी शिवारातील निळोबा जाधव याच्या शेतात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मगन पवार व पथकाने छापा टाकला. यावेळी तेथे काही जुगाऱ्यांना अटक केली. मात्र काही जण पोलिसांना पाहताच पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळावरुन ४० हजार रुपये रोख व सहा दुचाकी, जुगाराचे साहित्य असा एक लाख ९० हजाराचा ऐवज जप्त केला आहे.

हेही वाचा - नांदेड शहराच्या होळी भागातील व नुकतेच कर्नलपदी विराजमान झालेले मुकुंद माधवराव सरसर यांच्या पदोन्नतीमुळे नांदेडचे नाव देशपातळीवर कोरल्या गेले.

या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांच्या तक्रारीवरुन सतीष भंडारे, साहेबराव असोले, निळोबा जाधव, राजेश मुदीराज, शेख महेबुब , शेख शकील, शिवाजी जाधव, राजू डोंगरदिवे, शंकर असोले यांच्यासह इतर सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मल्लपिल्लु करत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com