जालन्यात मुलभूत सुविधांची बोंब, नगरपालिका सर्वसाधारण सभेत प्रश्नांवर पुन्हा चर्चेचे गुऱ्हाळ

उमेश वाघमारे
Monday, 28 December 2020

देशभरात औद्योगिक नगरी म्हणून ओळख असणाऱ्या जालना शहरात मुलभूत सुविधांची मात्र बोंबाब आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या प्रत्येक सर्वसाधारण सभेत शहरातील रस्ते, स्वच्छता, पाणी, पथदिवे, अतिक्रमण, मोकाट कुत्रे, जनावऱ्यांच्या प्रश्नांवर सभागृहात चर्चेचे गुऱ्हाळ रंगते.

जालना : देशभरात औद्योगिक नगरी म्हणून ओळख असणाऱ्या जालना शहरात मुलभूत सुविधांची मात्र बोंबाब आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या प्रत्येक सर्वसाधारण सभेत शहरातील रस्ते, स्वच्छता, पाणी, पथदिवे, अतिक्रमण, मोकाट कुत्रे, जनावऱ्यांच्या प्रश्नांवर सभागृहात चर्चेचे गुऱ्हाळ रंगते. मात्र, नगरपालिका प्रशासनाकडून वेळ मारून घेणारी नेहमीचे उत्तरे प्रत्येक सभेत दिला जातात. त्यामुळे नगरपालिका शहरातील नागरिकांनी मुलभूत सुविधा कधी पुरविणार असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. शहरातील टाऊन हॉल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सोमवारी (ता.२८) जालना नगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, उपनगराध्यक्षा अन्सारी फरहाना, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्यासह नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.

 

 

 

 

‘सकाळ’ने मांडलेल्या प्रश्नांवर चर्चा
जालना शहरात आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होतो. त्यात नगरपालिकेकडून कोणत्याही वेळेला पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे भर हिवाळ्यात नागरिकांना पाण्याची प्रतिक्षा कराण्याची वेळ येते. तसेच आठ ते दहा दिवस पुरेल एवढा पाण्याची साठवणुक करावी लागते. तसेच शहरातील अनेक प्रभागांमध्ये घंटागाड्या फिरकत नाहीत. त्यामुळे घरातील कचार रस्त्यावर टाकला जात आहे. अनेक भागातील पथदिवे ही बंद आहेत. या सर्व बाबींवर 'सकाळ'ने वृत्त प्रकाशित करून प्रकाश टाकला होता. या प्रश्नांवर सभागृहाच चर्चा झाली.

 

 

 

 

एकाला विरोध, ३२ मंजूर
सर्वसाधारण सभेत एकूण ३३ विषय मांडण्यात आले होते. यामध्ये समृद्धी मार्गावरील वृक्षारोपण व लॅन्ड स्केपिंगला जालना शहरातील सांडपाणी उपलब्ध करून देण्यास भाजपच्या नगरसेवकांनी विरोध दर्शविला. तर महात्मा फुले मार्केटच्या जागेवर शॉपिंग सेंटरच्या बांधकामासह इतर ३१ विषयांना सभागृहाने मंजुरी दिली आहे.
 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Basic Amenities Issue Again Discussed In Municipal Council Meeting Jalna