डॉक्टरमुळे क्वारंटाईन व्हावे लागले...मग काढला असा वचपा, बीड जिल्ह्यातील प्रकार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 April 2020

आम्हाला १४ दिवस क्वारंटाइन व्हावे लागले, याचा राग मनात धरून डॉक्टरवर हल्ला केल्याची घटना आष्टी तालुक्यातील सावरगाव येथे घडली. एकमेकांवर अंभोरा ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 

कडा (जि. बीड) - कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी प्रत्येक गावागावांत याची दक्षता घेतली जात आहे. ‘आम्हाला कोरोना झाला आहे, असे तुम्ही सांगितल्याने आम्हाला १४ दिवस क्वारंटाइन व्हावे लागले, याचा राग मनात धरून डॉक्टरवर हल्ला केल्याची घटना आष्टी तालुक्यातील सावरगाव येथे घडली. एकमेकांवर अंभोरा ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 

डॉ. कामराज कारभारी लोणकर (रा. सावरगाव) यांच्या फिर्यादीनुसार शुक्रवारी रात्री नऊ वाजता ते आपला दवाखाना बंद करण्याच्या तयारीत असताना त्यांच्या दवाखान्यात गावातील पाचजण आले. त्यांनी ‘तुम्ही आम्हाला कोरोना झाल्याचे सांगितल्यामुळे गावातील लोकांनी व सरपंचांनी आम्हाला १४ दिवस क्वारंटाइन केले तसेच तुम्ही आमची संपूर्ण गावात बदनामी केली, असे म्हणत काठी व धारदार शस्त्राने हल्ला करीत मारहाण केली. यावेळी डॉक्टरांच्या पत्नीलाही मारहाण केली. डॉ. कामराज लोणकर यांच्या फिर्यादीवरून पिराजी कुटे, शिवाजी कुटे, शोभा कुटे, सोमनाथ कुटे, मारुती कुटे यांच्यावर अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - युरोपात जर्मनीनेच रोखला मृत्युदर, सर्वाधिक चाचण्या, वेळेत उपचार

तुम्ही मुंबईहून आलात, तुम्हाला कोरोना झालाय का? अशी विचारपूस करून मानसिक त्रास दिला. याबाबत जाब विचारला म्हणून आमच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. याप्रकरणी डॉ. कामराज लोणकर, अनिल लोणकर, रामभाऊ आडसरे, अजित लोणकर, दीपक लोणकर यांच्याविरोधात पिराजी कुटे यांनीही अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. 

हेही वाचा - युरोपातील सर्व देशांनी आता संयुक्त कृती करावी - डॉ. जॉन कार्लोस

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beating the doctor for saying corona happened