esakal | Corona Breaking : बीडच्या स्वारातीतमध्ये १३ तासांत सहा बाधितांचा मृत्यू  
sakal

बोलून बातमी शोधा

corona death.jpg

चिंताजनक बाब म्हणजे मागच्या १३ तासांत सहा कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे सर्व सहाही मृत्यू एकट्या अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात झाले आहेत. 

Corona Breaking : बीडच्या स्वारातीतमध्ये १३ तासांत सहा बाधितांचा मृत्यू  

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा वेग वाढला असून मागच्या आठवडाभरात शंभर ते दीडशेने रोज संख्या वाढून आता हा आकडा १ हजार ३३७ एवढा झाला आहे. मृत्यूंची संख्याही साठच्या घरात पोचली आहे.

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  
चिंताजनक बाब म्हणजे मागच्या १३ तासांत सहा कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे सर्व सहाही मृत्यू एकट्या अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात झाले आहेत. 

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

सध्या जिल्ह्यातील स्वाराती, बीडचे जिल्हा रुग्णालय यासह विविध कोविड केअर सेंटरमध्ये बाराशेंवर कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु आहेत. बुधवारी ५२ रुग्णांवर योग्य उपचारानंतर त्यांना कोरोनामुक्त करण्यात आरोग्य विभागाला यश आले. कोरोनामुक्तांचा आकडा बुधवार सकाळ पर्यंत ८६३ झाला. मात्र, आतापर्यंत कोरेानाबळींचा आकडा मात्र साठच्या घरात गेला. मंगळवार रात्रीपासून बुधवार सकाळी नऊ वाजेपर्यंत सहा कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. यात तीन पुरूष आणि तीन महिला कोरोनाग्रस्त रुग्णांचा समावेश आहे. मृत्यू झालेले कोरोनाग्रस्त अंबाजोगाई, परळी आणि केज तालुक्यातील आहेत. 

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश

मृत्यूत आहे यांचा समावेश 

परळीतील शांतीनगर येथील ६८ वर्षीय महिलेस सोमवारी (ता. १०) सायंकाळी अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी रात्री १० वाजता या महिलेचा मृत्यू झाला.

अंबाजोगाई तालुक्यातील सोमनवाडी येथील ६० वर्षीय पुरूषाला रविवारी (ता. नऊ) याच रुग्णालयात रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचाही मंगळवारी रात्री साडेदहा वाजता मृत्यू झाला. 

अंबाजोगाईतील देशपांडे गल्लीतील रूग्णास मंगळवारी रात्री दहा वाजता दाखल केले होते. त्या रूग्णाचा बुधवारी पहाटे मृत्यू झाला. 

स्वाराती रूग्णालय परिसरातील शनिवारी पॉझिटीव्ह आढळलेल्या ६१ वर्षीय महिलेचा मंगळवारी रात्री साडेआठ वाजता मृत्यू झाला.

केजच्या अहिल्यादेवी नगर येथील रविवारी पॉझिटीव्ह आढळलेल्या ४६ वर्षीय व्यक्तीचा बुधवारी सकाळी वाजता मृत्यू झाला. 

अंबाजोगाईतील झारे गल्लीतील मंगळवारी पॉझिटीव्ह आढळलेल्या ७० वर्षीय वृद्धाचा बुधवारी सकाळी वाजता मृत्यू झाला.

(संपादन-प्रताप अवचार)