esakal | दिलासादायक! बीडमध्ये २४ तासांत १ हजारांपेक्षा जास्त कोरोनामुक्त

बोलून बातमी शोधा

corona updates
दिलासादायक! बीडमध्ये २४ तासांत १ हजारांपेक्षा जास्त कोरोनामुक्त
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड: कोरोना विषाणू संसर्गाच्या दोन्ही लाटांमध्ये या १३ महिन्यांत रविवारी (ता. २५) प्रथमच एका दिवसांत कोरोनामुक्त होण्याचा आकडा हजारांच्या पुढे गेला. रविवारी १ हजार ३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर १ हजार २३७ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अलीकडच्या काही दिवसांत जिल्ह्यात रोजच नवीन रुग्णांची संख्या एक हजार ते १ हजार २०० च्या घरात आहे. तुलनेने कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या कमी असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या तब्बल ९ हजार ७७८ झाली आहे. रविवारी मात्र प्रथमच जिल्ह्यातून १ हजार ०३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

हेही वाचा: रुग्णालयाच्या आवारातच केली प्रसूती, परिचारिकांचा सेवाभाव...

दरम्यान, रविवारी रुग्ण आढळण्याचे शेकडा प्रमाण २६ टक्के हाते. ४ हजार ७७९ लोकांच्या तपासण्यांमध्ये १ हजार २३७ रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची रुग्णसंख्या ४७ हजार २९२ झाली. आतापर्यंत ३६ हजार ६४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. रविवारी २० नवीन कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची नोंद झाली. जिल्ह्यातील ८४४ कोरोनाग्रस्तांचा आतापर्यंत उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हेही वाचा: Corona Updates: दिलासादायक! बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले

सध्या ९ हजार ७७८ रुग्ण सक्रिय असून यातील ३ हजार ७९८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असून, ३८९ रुग्ण बाहेर जिल्ह्यात उपचार घेत आहेत. तर ५ हजार ५९१ रुग्णांवर जिल्ह्यातील विविध कोविड रुग्णालय, कोविड हेल्थ सेंटर व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.