धक्कादायक..! अंबाजोगाईत टिप्परच्या धडकेने दुचाकीवरील तीन जण ठार

प्रशांत बर्दापूरकर
Sunday, 9 August 2020

काळवटी तांड्याजवळील घटना

वानटाकळी (ता.परळी) येथील नागनाथ महादेव गायके (वय ३५), वसंत जनार्दन गायके (वय ४५), विठ्ठल मुंजाजी गायके (वय २३) हे तिघे जागीच ठार झाले.

वानटाकळी गावावर पसरली शोककळा. 

अंबाजोगाई (बीड) :  तालुक्यातील काळवटी तांड्याजवळ शनिवारी (ता.८) रात्री टिप्पर व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील तिघेही जागीच ठार झाले. या घटनेचा येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित टिप्परच्या चालकाला अटक केल्याचे पोलिस निरीक्षक महादेव राऊत यांनी सांगितले. 

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

घटनेची माहिती अशी, की शनिवारी रात्री वाळुचा टिप्पर (क्र. एम. एच. २५ यु २४४४) हा परळीहून अंबाजोगाईकडे येत होता. यावेळी वानटाकळी (ता.परळी) येथील तिघेजण दुचाकीवर ( क्र. एम. एच. १३, बी. डी. ५६८४) आपल्या गावाकडे जात होते. यावेळी समोरून आलेल्या टिप्परने या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात नागनाथ महादेव गायके (वय ३५), वसंत जनार्दन गायके (वय ४५), विठ्ठल मुंजाजी गायके (वय २३) हे तिघे जागीच ठार झाले.

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

घटनेची माहिती कळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आपल्या सहका-यांसह घटनास्थळी पोचले. दरम्यान या घटनेतील चालकाला पोलिसांनी अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे .

मध्यरात्री जिल्हाधिकारी कोवीड वॉर्डात घुसतात तेव्हा...  

संपादन - प्रताप अवचार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed District Accident three young man death