खळबळजनक! पाटोदा येथे भावाकडून सख्ख्या भावाचा खून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

बीड जिल्ह्यातील अंबाजाेगाई तालुक्यातील पाटाेदा ममदापूर येथे सख्ख्या भावाने दारूच्या नशेत भावाच्याच डाेक्यात दगड मारून खून केल्याची घटना घडली. यामुळे गावात खळबळ उडाली आहे.

अंबाजोगाई (जि. बीड) - तालुक्‍यातील पाटोदा (ममदापूर) येथे रविवारी (ता. आठ) सायंकाळी सहाच्या सुमारास भावानेच आपल्या सख्ख्या भावाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली. विलास मोहन यशवंत (वय 50) असे मृताचे नाव आहे. ही घटना दारूच्या नशेत झाल्याचे प्राथमिक कारण सांगण्यात येत असून येथील ग्रामीण पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की रविवारी सायंकाळी गावातच बंडू मोहन यशवंत व त्याचा भाऊ विलास मोहन यशवंत यांच्यात वाद झाला. या वादातून बंडूने त्याचा भाऊ विलासच्या डोक्‍यात दगड मारला. त्यात विलास जागेवरच ठार झाला.

हेही वाचा - सेक्ससाठी तीन हजारांचा रेट, या शहरातील मॉल व्यवस्थापकासह एजंट, वारांगना अटकेत

घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत ग्रामीण पोलिस ठाण्यात घटनेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. हा खून नेमका कशामुळे झाला, याचे निश्‍चित कारण तपासात कळेल असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा - परभणी शहरातून बारा लाख रुपयांचे चोरीचे तांबे जप्त

दरम्यान, पोलिस उपअधीक्षक राहुल धस व पोलिस उपनिरीक्षक राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the Beed district Brother's murder