चिंताजनक! बीडमध्ये २४ तासांत कोरोनाचे सव्वा दोनशे नवीन रुग्ण

आतापर्यंतच्या बाधितांची संख्या ९० हजार ३७ एवढी झाली आहे. यापैकी ८६ हजार २५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत
covid 19
covid 19covid 19

बीड: जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणू संसर्गाच्या (covid 19 cases) तपासण्यांची संख्या वाढविल्याने रुग्णसंख्येत गुरुवारी (ता. १७) वाढ झाली. २२४ नवे रुग्ण आणि नवीन-जुन्या २१ कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूंची नोंद झाली. दरम्यान, लोकांना गर्दी करण्याचा मोह आवरेना गेला असून, बाजारपेठांतील गर्दी लग्नसराईपेक्षाही अधिक असल्याचे चित्र आहे. बुधवारी ३ हजार ४२४ लोकांचे स्वॅब नमुने तपासण्यात आले. गुरुवारी प्राप्त अहवालात २२४ जण बाधित आढळले. पॉझिटीवहीटी रेट ६.५४ होता. तर ३ हजार २०० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात १८, आष्टी ४३, बीड ३०, धारूर आठ, गेवराई २८, केज ३४, माजलगाव सहा, परळी २०, पाटोदा ११, शिरुर १७ व वडवणी तालुक्यातील नऊ रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंतच्या बाधितांची संख्या ९० हजार ३७ एवढी झाली आहे. यापैकी ८६ हजार २५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. २४ तासांत आठ मृत्यूंची नोंद झाली. यामध्ये कासारी (ता. धारूर) येथील ७० वर्षीय पुरुष, उमराई (ता. केज) येथील ४७ वर्षीय पुरुष, अंबाजोगाईतील शाहूनगरातील ३० वर्षीय महिला, वाहेगाव (तागेवराई) येथील ४८ वर्षीय पुरुष, परळी तालुक्यातील पिंप्री (बुद्रूक)येथील ४२ वर्षीय पुरुष, देवगाव (ता.केज) येथील ४६ वर्षीय पुरुष, अंबाजोगाईतील ६५ वर्षीय पुरुष व धारूर येथील प्रतिभानगरातील ६५ वर्षीय पुरुष यांचा मृतांत समावेश आहे. गुरुवारी प्रलंबीत १३ मृत्यूंची नोंद पोर्टलवर झाली. एकूण कोरोना बळींचा आकडा दोन हजार ४०७ इतका झाला आहे.

covid 19
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या उस्मानाबादच्या दौऱ्यावर

‘म्युकर’चे दोन रुग्ण वाढले
गुरुवारी म्युकरमायकोसिसच्या दोन रुग्णांची वाढ होऊन १६७ रुग्णसंख्या झाली. सध्या अंबाजोगाईच्या स्वारातीमध्ये १११ रुग्ण उपचाराखाली असून २२ रुग्ण डिस्चार्ज झाले. तर २५ रुग्णांचा मृत्यू झाला. आता सिव्हिलमध्येही म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचाराची सोय करण्यात आली असून, त्यासाठीची संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com