बीड झेडपीत महाविकास आघाडी ऍलर्ट, सदस्य सहलीवर

दत्ता देशमुख
बुधवार, 22 जानेवारी 2020

  • राष्ट्रवादीचाच राहणार वरचष्मा 
  • महत्त्वाच्या समित्या, सभापतिपदांसाठी रस्सीखेच 
  • शिवसेनेला सभापतिपद देण्यावरून दोन मतप्रवाह 
  • पंडित-क्षीरसागर गट पदाविना राहण्याची शक्‍यता

बीड - महाविकास आघाडीची मोट बांधत जिल्हा परिषदेवर सत्तांतर करण्यात यश मिळविलेल्या राष्ट्रवादीने आता विषय समित्यांच्या सभापतींसाठीही राष्ट्रवादीने पूर्ण तयारी केली आहे. राष्ट्रवादीकडील सदस्यांना सोमवारीच (ता. 20) सहलीवर पाठविले आहेत. शुक्रवारी (ता. 24) विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडी होणार आहेत. 

महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्तांतर झाले असले तरी अध्यक्ष-उपाध्यक्षपद राष्ट्रवादीलाच मिळाले आहे. समित्यांमध्येही याच पक्षाचा वाटा अधिक राहणार आहे. महत्त्वाच्या समित्या आणि सभापतिपदांसाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच असून शिवसेनेला सभापतिपद देण्यावरून राष्ट्रवादीत दोन मतप्रवाह आहेत. 

बीड जिल्ह्याला आता नऊ आमदार, संजय दाैंड बिनविरोध

धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळाल्याने हुरूप चढलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्हा परिषदेवरील भाजपची सत्ता उलटवून सत्तांतर करण्यात यश मिळविले. अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिवकन्या सिरसाट, तर उपाध्यक्षपदी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची निवड झाली. दरम्यान, 24 जानेवारीला विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडी आहेत. महाविकास आघाडी झाली असली तरी विषय समित्यांसाठी राष्ट्रवादीतच रस्सीखेच सुरू आहे. 

चिठ्ठीमुक्त रुग्णालयासाठी लवकरच तीन विभागांची संयुक्त बैठक 

महत्त्वाच्या समित्या; सभापतिपदांसाठी रस्सीखेच 
जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षानंतर आता समाजकल्याण, शिक्षण व आरोग्य, महिला व बालविकास आणि बांधकाम आणि कृषी व पशुसंवर्धन या समित्यांच्या या सभापतींच्या निवडी होणार आहेत. यातील समाजकल्याण सभापतींची निवड स्वतंत्र असून उर्वरित चार समित्यांसाठी तीन सभापतींची निवड केली जाईल. एक समिती उपाध्यक्षांना असते.

नाशिकच्या मुलीसोबतही झाला होता तो प्रकार!

दरम्यान, पूर्वीच्या राष्ट्रवादीच्या सत्तेत उपाध्यक्षांकडे नेहमी बांधकाम समिती असे; परंतु आशा दौंड यांना उपाध्यक्षपद दिल्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना कृषी व पशुसंवर्धन समिती त्यांना दिली. त्यानंतर मागच्या भाजपच्या काळातही हाच नवा पायंडा कायम राहिला. दरम्यान, बांधकाम समितीसाठी उपाध्यक्ष बजरंग सोनवणे आग्रही असून जयसिंह सोळंके देखील या समितीसाठी इच्छुक आहेत. प्रकाश सोळंके गटाचे सर्वाधिक सदस्य असल्याने त्यांच्याकडून दोन समित्यांची मागणी होत आहे. समाजकल्याणसाठीही सोळंके गटाचा जोर आहे. 

राजकारण थांबवा, विकासाचे काय ते बोला

पंडित-क्षीरसागर गट पदाविना राहण्याची शक्‍यता 
अध्यक्षपद हे आमदार प्रकाश सोळंके यांच्या संमतीने धनंजय मुंडे समर्थक शिवकन्या सिरसाट यांना मिळाले. तर उपाध्यक्षपद सर्वसंमतीने बजरंग सोनवणे यांना मिळाले. आता समित्यांमध्ये सोळंके दोन पदांसाठी दावा ठोकत आहेत.

महाविकास आघाडीतील शिवसेनेला एक आणि दुसरे भाजपतून आलेल्या शोभा दरेकर यांना जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आमदार संदीप क्षीरसागर व माजी आमदार अमरसिंह पंडित या दोघांच्या गटाला पद मिळण्याची शक्‍यता धुसर आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील कॉंग्रेसचे राजेसाहेब देशमुख इच्छुक असले, तरी त्यांनाही पदाची शक्‍यता कमीच आहे. शिवसेनेला पद देण्याबाबत राष्ट्रवादीत दोन मतप्रवाह आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed District Council Chairman Election