esakal | अहवाल पॉझिटिव्ह, अन् आरोग्य विभागाची गाडी गेली दारूच्या अड्ड्यावर !
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus image.jpg

आष्टी तालुक्यातील वटणवाडी येथील ४५ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आष्टी ग्रामीण रुग्णालयाचे पथक रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गावात पोहोचले असता सदरील बाधित व्यक्ती हा कडा येथे दारूच्या नशेत तर्र असल्याचे समजताच आरोग्य विभागाचे पथक कडा येथे गेले.

अहवाल पॉझिटिव्ह, अन् आरोग्य विभागाची गाडी गेली दारूच्या अड्ड्यावर !

sakal_logo
By
निसार शेख

कडा (बीड) : आष्टी तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. असून कडा परिसरातील अनेक गावात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहे. परंतु आष्टी तालुक्यातील वटणवाडी येथे कोरोनाग्रस्त रुग्णाला घेण्यासाठी आरोग्य विभागाची गाडी आली अन् कोरोना बाधिताने तेथून ठोकली धूम, कोरोनाग्रस्त रुग्ण पुढे व आरोग्य अधिकारी व कर्मचारी माघे, असा प्रकार दोन दिवसापुर्वी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

आष्टी तालुक्यातील वटणवाडी येथील ४५ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आष्टी ग्रामीण रुग्णालयाचे पथक रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गावात पोहोचले असता सदरील बाधित व्यक्ती हा कडा येथे दारूच्या नशेत तर्र असल्याचे समजताच आरोग्य विभागाचे पथक कडा येथे गेले. परंतु आपल्याला घेण्यासाठी गाडी आल्याची चाहूल लागताच गाडीला पाहून त्याने तेथून धूम ठोकली. तो पुढे अन् पथक मागे असा प्रकार घडला.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

रात्रभर सदरील पथकाने कडा व परिसरात त्या बधिताचा शोध घेतला परंतु तो बाधित सापडला नाही. त्यामुळे सदरील आरोग्य पथकाला मोकळ्या हाताने परत फिरावे लागले. गुरुवारी (ता.१७) सदरील बाधित रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. असे प्रकार घडू नये. यासाठी आरोग्य पथकाला मदतीसाठी पोलीस व ग्रामपंचायतचे कर्मचारी प्रशासनाने सोबत दिले पाहिजे. तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते व नातेवाईकांनीही आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांना मदत केली पाहिजे त्यामुळे असे प्रकार घडणार नाही.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(Edit- Pratap Awachar)