

Beed News
esakal
बीड: तुमच्याकडे गॅसचे वैध कनेक्शन आहे का? मग केवायसीसाठी कुठल्याही कंपनीच्या गॅस एजन्सीत जायची गरज नाही. अगदी काही मिनिटांमध्ये आणि तेही घरबसल्या तुम्ही ई-केवायसी करू शकता. विशेष म्हणजे, यासाठी तुम्हाला कुठलाही खर्च लागत नाही. त्यामुळे कोणताही एजन्सीधारक एजन्सीत येण्याची सक्ती करीत असेल तर ग्राहकांनी त्याविरोधात आवाज उठवायला हवा, असे आवाहन इंधन तेल कंपन्यांनी केले आहे.