बीडच्या शिरपेचात मानाचा तुरा, अंबाजोगाईचे सुमित व सौरभ हे दोन सुपुत्र झाले लेफ्टनंट

प्रशांत बर्दापूरकर
Sunday, 14 June 2020

 सांस्कृतिक व शैक्षणिक नगरी म्हणून ओळख असलेल्या अंबाजोगाईच्या दोन सुपुत्रांची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदी नियुक्ती झाल्याने बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा भरला गेला आहे. सुमित शिवानंद हरंगुळे व सौरभ बाबासाहेब लुगडे या दोघांची शनिवारी (ता.१३) भारतीय सैन्यादलात लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली आहे.  

अंबाजोगाई : सांस्कृतिक व शैक्षणिक नगरी म्हणून ओळख असलेल्या अंबाजोगाईच्या दोन सुपुत्रांची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदी नियुक्ती झाल्याने बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा भरला गेला आहे. सुमित शिवानंद हरंगुळे व सौरभ बाबासाहेब लुगडे या दोघांची शनिवारी (ता.१३) भारतीय सैन्यादलात लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली आहे.  

 

अजिंठ्यात खळबळ : दोनच दिवसांपूर्वी झाला साखरपुडा, आता...

अंबाजोगाई ही शैक्षणिक व सांस्कृतिक नगरी असली तरी, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्याचा मोठा वारसा आहे. या नगरीत स्वामीजींनी शिक्षणाबरोबरच मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले. अशा या नगरीतील सुमित  व सौरभ या दोघांनी भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदावर नियुक्ती मिळवून बीड जिल्ह्याचा मान वाढवला आहे.

 

अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.

अंबाजोगाईच्या योगेश्वरी नुतन विद्यालयात प्राथमिक शिक्षण घेतलेल्या सुमितने, सहावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण सातारा येथील शासकीय सैनिक स्कुलमध्ये घेतले.  युपीएससीची परीक्षा देत त्याने पुण्याच्या नँशनल डिफेन्स अकादमीत तीन वर्षाचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्याने लेफ्टनंटपदी झेप घेतली. डेहराडून येथील भारतीय सैन्य दलाच्या प्रशिक्षण केंद्रात एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याची सिक्कीम येथे लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली.

उस्मानाबादेत गर्भवती महिलेला कोरोनाची लागण   

सौरभ बीटेक करून सैन्यदलात

सौरभ लुगडेचे वडील बाबासाहेब लुगडे हे सैन्यदलातून लेफ्टनंट कर्नल पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्याला घरातूनच देशसेवेचा वारसा आहे. त्याचे सातवीपर्यंतचे शिक्षण सैनिकी शाळेत झाले. आठवी ते दहावीच्या शिक्षणासाठी तो अंबाजोगाईतील एम.आय.टी. च्या सरस्वती पब्लिक स्कूलमध्ये होता.

वृक्षलागवडीचा ‘रामपुरी पॅटर्न’ आता संपूर्ण जिल्ह्यात  

पुण्याच्या ऑल इंडिया श्री. शिवाजी मेमोरियल सोसायटी ऑफ इंजिनीअरिंग महाविद्यालयातून त्याने बीटेक पूर्ण केल्यानंतर त्याची थेट भारतीय सैन्य दलाच्या डेहराडून येथील प्रशिक्षणासाठी निवड झाली. या प्रशिक्षणानंतर त्याची उत्तर प्रदेशातील मेरठ येथे लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली.
शैक्षणिक परंपरा असलेल्या अंबानगरीच्या या दोन्ही सुपुत्रांनी देशसेवेचा वसा घेऊन अंबाजोगाईसह बीड जिल्ह्याची मान उंचावली आहे. त्यांच्या या जिद्दी व धाडसी  निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed good news : Ambajogai teo son lieutenent