जेष्ठ शिक्षण तज्ञ नांदेडे व पंडित यांच्या उपस्थितीत आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

जगदीश बेदरे
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

गेवराई (जिल्हा बीड) : शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय काम करणार्‍या शिक्षकांचा स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल-श्रीफळ देवून मान्यवरांच्या हस्ते गौरव केला जात असून, यावर्षी विधान परिषद सदस्य आ. सतिश चव्हाण यांच्या शुभहस्ते तर तर जेष्ठ शिक्षण तज्ञ तथा माजी शिक्षण संचालक डॉ. गोंविंद नांदेडे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शारदा प्रतिष्ठानचे कार्यवाह आ. अमरसिंह पंडित यांनी दिली.

गेवराई विधानसभा मतदार संघातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या गुरुजनांचा गौरव व्हावा, शैक्षणिक क्षेत्रात अधिकाधिक प्रगती होण्याच्या दृष्टीने आ. अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली शारदा प्रतिष्ठान या सामाजिक स्वयंसेवी संस्थेकडून दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. शिक्षक दिनाच्या औचित्याने समारंभपूर्वक मान्यवरांच्या शुभहस्ते आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण होणार आहे. शारदा प्रतिष्ठानकडून गेवराई विधानसभा मतदार संघातील प्राथमिक शाळेतील ७ शिक्षकांना, १ विशेष शिक्षक, अल्पसंख्यांक विभागातील १ शिक्षक आणि खाजगी माध्यमिक विभागातील २ शिक्षक असे ११ आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जाणार आहेत.

प्रतिष्ठानच्या दहाव्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता शिवाजीनगर, गढी येथील माऊली सभागृहात होणार आहे. तरी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ. अमरसिंह पंडित यांनी केले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
राज्य मार्गावरील दारूविक्रीचा मार्ग खुला
भाजपच्या विरोधात शिवसेनेचा 'निष्ठावंत' फॉर्म्युला
नोटाबंदीचा लाभ झाल्याचा दावा; संशयास्पद व्यवहार उघड
सुनील अरोरा नवे निवडणूक आयुक्त; राजीव महर्षी 'कॅग'
सुज्ञ कोल्हापूरकर...!
उजनीचे पाणी पंढरपुरात
इमारतींच्या पुनर्विकासाचा आराखडा सरकारकडे नाही!
दक्षिण मुंबईतील इमारत कोसळून 21 ठार; 12 जखमी
मुंबईतील पावसाच्या बळींची संख्या नऊवर

Web Title: beed news Distribution of Adarsh Teacher Award