esakal | Coronavirus| आता Remdesivir मिळणार तालुक्याच्या ठिकाणी
sakal

बोलून बातमी शोधा

Remdesivir

Coronavirus| आता Remdesivir मिळणार तालुक्याच्या ठिकाणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड: कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि रेमडेसिव्हिरच्या तुटवड्याने लोक हतबल झाले आहेत. त्यातच रेमडेसिव्हिरच्या नोंदणी आणि उपलब्धतेसाठी रुग्णांच्या नातेवाइकांना जिल्ह्याच्या ठिकाणी चकरा माराव्या लागत होत्या. मात्र, त्यांचा हा ताण कमी होणार आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा वेग अधिक आहे. सध्या साधारण दहा हजार रुग्ण सक्रिय असून, साडेपाच हजारांहून अधिक रुग्ण उपचाराखाली आहेत. दरम्यान, अलीकडे जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. शासकीय आरोग्य संस्थांमध्ये इंजेक्शन्स असले तरी खासगी उपचार केंद्रांमध्ये इंजेक्शन्स मिळणे कठीण आहे.

हेही वाचा: Corona Updates: दिलासादायक! बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले

रोज साधारण २०० इंजेक्शन्स उपलब्ध होतात. दरम्यान, काळाबाजार कमी व्हावा यासाठी प्रशासनाने बीडला नोंदणी सुरू केली होती. सुरुवातीचे काही दिवस रुग्णांच्या नातेवाइकांना दोन दिवस ताटकळत उभे राहावे लागले. या ठिकाणी नोंदणीनंतर दुसऱ्या दिवशी उपलब्धतेनंतर इंजेक्शन्स दिले जात होते. मात्र, यामुळे आष्टी, परळी, माजलगाव अशा दूरवरून रुग्णांच्या नातेवाइकांना दोन-तीन दिवस सलग बीडला येण्याने त्यांची मोठी फरफट होत होती. आता मात्र तालुक्यांच्या ठिकाणीच इंजेक्शन्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

हेही वाचा: रुग्णालयाच्या आवारातच केली प्रसूती, परिचारिकांचा सेवाभाव...

तालुक्याच्या ठिकाणी खासगी कोविड हॉस्पिटल मध्ये भरती असलेले रुग्णांना जर त्यांचे फिजिशियन यांनी रेमडेसिव्हिर इंजेक्शन देणे आवश्यक आहे अशी शिफारस केली असल्यास, त्या ठिकाणीच तहसीलदारांनी यादी तयार करून जिल्हा प्रशासनाला पाठवायची आहे. त्यामुळे बीडला आयटीआय येथे रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नातेवाइकांना पडणार नाही. जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा होईल त्यानुसार तो एजन्सीकडून उपलब्ध करून घेऊन नोंदणी प्रमाणे प्रत्येक रुग्णास एक याप्रमाणे त्यांचे रुग्णालयास (कोविड हॉस्पिटल) वाटप करण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी तथा रेमडेसिव्हिर वाटपाचे नियंत्रक प्रवीण धरमकर यांनी सांगितले.

loading image