बीड : पंचायतीतून रोहयो फाइलींची चोरी

बीड येथे फाइलच्या आधारे होती घोटाळ्याची चौकशी सुरू
Beed panchayat samiti files theft
Beed panchayat samiti files theft

बीड : पंचायत समितीच्या जुन्या इमारतीमध्ये ठेवलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या फाइलींची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अधिकारी व पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, पंचायत समिती अंतर्गत रोहयो कामांतील अनियमिततेप्रकरणी दीड वर्षापूर्वी गुन्हा नोंद झालेला आहे. त्यामुळे हा प्रकार गंभीर मानला जात आहे.

बीड पंचायत समिती अंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामांतील अनियमिततेबद्दल गुन्हाही नोंद झालेला आहे. या सगळ्या फाइली पंचायत समितीच्या जुन्या इमारतीमध्ये ठेवण्यात आलेल्या होत्या. यात मोजमाप पुस्तिका, हजेरी पत्रक, प्रशासकीय खर्चाचे सर्व उपप्रमाणके, मस्टर, टँकर नोंद वही, तांत्रिक मान्यता संचिका यासह आदी फाइलींचा समावेश होता. या फाइलींची चोरी झाल्याचे सोमवारी समोर आले. खिडकीचे गज काढून अज्ञात चोरट्याने फाइली चोरून नेल्या आहेत.

हा प्रकार पंचायत समितीचे कक्षप्रमुख श्री. डोंगरे, श्री. कदम आणि श्री. कुलकर्णी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. सानप, शिवाजी नगर ठाण्याचे केतन राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली.

गौडबंगालाचे पुरावे

पंचायत समिती अंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामातील अनियमिततेप्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला आहे. नेमक्या याच विषयाच्या फाइलींची चोरी झाल्याने मोठे पुरावेच या मंडळींनी गायब केल्याचे मानले जात आहे. अगोदरच्या प्रकरणाचा तपासही अद्याप नीट नाही आणि आता पुराव्यांची चोरी झाल्याने पोलिस काय करतात? याकडे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com