Beed : आईला २४ सुवर्णपदके; वडिलांकडूनही राज्याचे नेतृत्व, बीडच्या सचिनचा क्रिकेट मधला आलेख बहरताच

पालकांनी गाजविले कबड्डीचे मैदान; मुलगा क्रिकेटमध्ये...
Beed news
Beed newsesakal

केज : जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडू सचिन संजय धस याने आपल्या क्रिकेट खेळातील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघात स्थान पटकावले आहे. आगामी काळात दुबई येथे होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेत तो भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करेल. सचिन धस हा बॅट्समन व ऑफ स्पिनर बॉलर आहे.

Beed news
Winter Fashion Tips : हिवाळ्यात दिसायचे आहे कूल? मग, ‘या’ सोप्या टीप्सच्या मदतीने मिळवा स्टायलिश लूक

धस हे कुटुंब मुळचे परिसरातील सांगवीचे आहे. मागील अनेक वर्षांपासून ते बीडमध्ये राहतात. सचिन धस हा लहानपणीपासूनच क्रिकेटचे धडे गिरवतोय. सचिनला प्रारंभापासूनच क्रिकेटची आवड असल्याने त्याच्या खेळाला कौशल्याची जोड मिळावी, म्हणून त्याने शहरातीलच आदर्श क्लबमध्ये क्रिकेटचे धडे गिरविले. त्याच्या खेळाला जिल्हा क्रिकेट असोसिएशननेही कायम प्रोत्साहन दिले.

Beed news
Thyroid Control Tips : थायरॉईडला कंट्रोल करण्यासाठी ‘या’ सोप्या आयुर्वेदिक टीप्सची घ्या मदत

सर्वात प्रथम सचिन धस राजकोट येथे झालेल्या अंडर १४ क्रिकेट संघाकडून राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेत खेळला. तेव्हापासून त्याच्या यशाचा आलेख चढताच होता. प्रारंभी विभागीय स्तरावर खेळल्यानंतर त्याची १४ वर्षांखालील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड झाली. राजकोट येथे झालेल्या स्पर्धेतील खेळाच्या माध्यमातून त्याची १९ वर्षांखालील संघात स्थान निवड झाली. सध्या विजयवाडा येथे इंग्लंड, बांगलादेश, भारत अ व भारत ब असे चौरंगी क्रिकेट सामने सुरु आहेत. तो भारत ब संघाकडून खेळत आहे. या स्पर्धेत त्याने इंग्लंड विरुद्ध १०७ तर भारत अ संघाविरुद्ध खेळताना १३४ धावा ठोकल्याआहेत.

Beed news
Hair Care Tips : तुम्ही केसांना कधी काळे मीठ लावलंय का? नाही तर हा प्रयोग करून बघाच

आईला २४ सुवर्णपदके; वडिलांकडूनही राज्याचे नेतृत्व

सचिनचे वडील संजय धस आरोग्य विभागात हिवताप कार्यालयात तंत्रज्ञ तर आई सुरेखा धस सहायक पोलिस निरीक्षक आहेत. सचिन व समिक्षा ही त्यांना दोन मुले. समिक्षा स्पर्धा परीक्षेची तयारी करते. तर, सचिन सुरुवातीपासून क्रिकेटवर लक्ष केंद्रित करुन आहे. वडील संजय धस यांनीही कबड्डीचे मैदाने गाजविलेली आहेत. महाविद्यालयीन संघातर्फे खेळताना विदर्भात त्यांनी राज्य संघाचे नेतृत्व केलेले आहे. त्यांना सुवर्णपदक देखील मिळालेले आहे. तर, आई सुरेखा धस या कबड्डीच्या राष्ट्रीय खेळाडू राहिलेल्या आहेत. त्यांनी तब्बल २४ सुवर्णपदके मिळविलेली आहेत.

सचिनचा आलेख बहरताच

१४ वर्षांखालील संघातून २०१६ पासून क्रिकेटच्या मैदानात असलेल्या सचिनने २०१८- १९ च्या हंगामात वेस्ट झोन लिगमध्ये संघाचे कर्णधारपद सांभाळले. २०१९- २० मध्ये तो १६ वर्षांखालील प्लेअर ऑफ द इअर बेस्ट बॅट्समन ठरला. २०२२- २३ च्या हंगामात कूच बेहर ट्रॉफी व विनू मंकड ट्रॉफ्यांमध्ये खेळताना त्याने १९ वर्षांखालील संघाचे कर्णधारपद सांभाळले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com