Sushma Andhare : '.. म्हणून सुषमा अंधारे यांना चापट मारली', ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा दावा Video Viral

सुषमा अंधारे कशासाठी देखील पैसे मागत असून आपण त्यांना दोन चापट मारल्या असा दावा खुद्द अप्पासाहेब जाधव यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून केला.
Appasaheb jadhav and sushma andhare
Appasaheb jadhav and sushma andharesakal

बीड - शिवसेना (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर त्यांच्याच पक्षाच्या जिल्हा प्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी गंभीर आरोप केले आहेत. सुषमा अंधारे कशासाठी देखील पैसे मागत असून आपण त्यांना दोन चापट मारल्या असा दावा खुद्द अप्पासाहेब जाधव यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून केला.

शिवसेनेच्या राज्यभर निघालेल्या महाप्रबोधन यात्रेचा समारोप शनिवारी (ता. २०) बीडमध्ये होणार असून या सभेला शिवसेना नेते खासदार संजय राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे येणार आहेत. दरम्याम, गुरुवारी सभेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी श्रीमती अंधारे बीडमध्ये आल्या. यावेळी त्यांच्या समोरच जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव आणि उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यात हाणामारी देखील झाली.

Appasaheb jadhav and sushma andhare
Tuljabhavani Mandir Row: तुळजाभवानी मंदिर प्रशासनाची माघार! 'तो' वादग्रस्त निर्णय मागे; दिलं स्पष्टीकरण

यात वरेकर यांनी जाधव यांच्या वाहनावर लाकडी फळी देखील मारली. दरम्यान, यानंतर अप्पासाहेब जाधव यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुषमा अंधारे त्यांच्या कार्यालयातील एसी, फर्निचरसाठी पैसे मागतात, पदे विकत असून आपले पद देखील विक्री काढल्याचा आरोप अप्पासाहेब जाधव यांनी या व्हिडिओत केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com