Tuljabhavani Mandir Row: तुळजाभवानी मंदिर प्रशासनाची माघार! 'तो' वादग्रस्त निर्णय मागे; दिलं स्पष्टीकरण

सोशल मीडियामधून मंदिर प्रशासनाच्या या निर्णयावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.
Tuljabhavani Mandir Row: तुळजाभवानी मंदिर प्रशासनाची माघार! 'तो' वादग्रस्त निर्णय मागे; दिलं स्पष्टीकरण

तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर परिसरात आज सकाळी भाविकांसाठी एक फलक लावण्यात आला होता. यावर तोकड्या कपड्यात मंदिरात प्रवेश मिळणार नाही, असा मजकूर लिहिण्यात आला होता. पण यावरुन मोठा वाद निर्माण झाल्यानं आता मंदिर प्रशासनावर आपला हा निर्णय मागे घेण्याची नामुष्की ओढवली आहे. हा निर्णय मागे का घेतला याबाबत तहसीलदारांनी एक निवेदन प्रसिद्ध करत स्पष्टीकरणही दिलं आहे. (Tuljabhavani Mandir Row took controversial decision back about not wearing short clothes to entry aau85

Tuljabhavani Mandir Row: तुळजाभवानी मंदिर प्रशासनाची माघार! 'तो' वादग्रस्त निर्णय मागे; दिलं स्पष्टीकरण
Amazon Investment: भारतीयांना दरवर्षी मिळणार दीड लाख नोकऱ्या! अ‍ॅमेझॉन करणार मोठी गुंतवणूक

तुळजाभवानी मंदिराबाहेर भाविकांच्या ड्रेसकोडबाबत फलक लावण्यात आला होता. यामध्ये म्हटलं होतं की, "अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य व अशोभनीय वस्त्रधारी तसेच हाफ पँट, बर्मुडाधारींना मंदिरात प्रवेश नाही. कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यतचं भान ठेवा" पण या अचानक आणलेल्या नियमावर भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियातूनही यावरु मोठ्या प्रमाणावर टीका झाली. यानंतर प्रशासनानं अखेर या निर्णयावरुन युटर्न घेतला आहे. याबाबत तहसीलदारांनी निवेदन प्रसिद्ध करत स्पष्टीकरणही दिलं.

Tuljabhavani Mandir Row: तुळजाभवानी मंदिर प्रशासनाची माघार! 'तो' वादग्रस्त निर्णय मागे; दिलं स्पष्टीकरण
Kiren Rijiju: ...अन् रिजीजूंची झाली उचलबांगडी! जाणून घ्या का काढून घेतलं कायदा मंत्रीपद

दरम्यान, याबाबत प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलंय की, "मंदिरातील सर्व महंत, पुजारी, सेवेदारी आणि भाविक भक्तांना कळविण्यात येते की, श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये पुजेसाठी अथवा दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही भाविकांना कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. तरी सर्व भाविक भक्तांनी याची नोंद घ्यावी"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com