बीड : धक्कादायक..! बारा वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

तालुक्यातील सोन्ना खोटा येथील बारा वर्षीय मुलगा शेतात काम करत असताना गावातीलच वीस वर्षीय मुलाने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

वडवणी (बीड) : तालुक्यातील सोन्ना खोटा येथील बारा वर्षीय मुलगा शेतात काम करत असताना गावातीलच वीस वर्षीय मुलाने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.

तालुक्यातील मौजे सोन्ना खोटा येथील बारा वर्षीय मुलगा (ता.२३) जुन रोजी शेतात गवत काढत होता. गावातील रामा नारायण खोटे वय वर्षे २० याने त्यांच्या जवळ जावून तोंड दाबून, जवळ असलेल्या उसाच्या शेतात ओढत जावून मारहाण केली.

अजिंठ्यात खळबळ : दोनच दिवसांपूर्वी झाला साखरपुडा, आता...

त्यांच्या सोबत अनैसर्गिक संभोग करून अवघड जागी  ईजा केली. पिडीत मुलाचे वडील हरिदास गोविंद खोटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश टाक करीत आहेत. गुन्हा दाखल होताच महेश टाक यांनी आरोपीला अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अवघ्या चार तासात आरोपीला धारूर परिसरातून अटक केली.

संघर्ष योध्याला आमचे आयुष्य लाभू ध्या..! चाहत्यांकडून मुंडेंसाठी प्रार्थना   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed Unnatural atrocities with twelve year old boy