बीडच्या एलआयसी कार्यालयाला भीषण आग, लाखो कागदपत्रे जळून खाक

ई सकाळ टीम
Monday, 9 November 2020

बीड येथील भारतीय आयुर्विमाच्या (एलआयसी) मुख्य कार्यालयाला सोमवारी (ता.नऊ) पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. यात लाखो कागदपत्रे जळून खाक झाली आहेत.

बीड : बीड येथील भारतीय आयुर्विमाच्या (एलआयसी) मुख्य कार्यालयाला सोमवारी (ता.नऊ) पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. यात लाखो कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. बीड शहरातील नगर रस्त्यावरील एलआयसीच्या कार्यालयाला आज पहाटे भीषण आग लागली होती. या आगीत पूर्ण कार्यालय जळून खाक झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

पिस्तूल विकायला आले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले, तीन संशयितांना अटक

या कार्यालयामधील जुने दस्तावेज आणि संगणक महत्त्वाचे साहित्य जळून राख झाले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन  गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविल आहे. आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास आग लागल्याने आग पूर्ण कार्यालयात पसरली.

ही आग प्रचंड भीषण असल्यामुळे कार्यालयामधील साहित्य जळून खाक झाले आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे कळते. कोणत्या कारणामुळे ही आग लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या प्रकरणी पोलिसांकडून घटनास्थळी तपास सुरू आहे. ही आग धुमसत असल्याने पुन्हा रौद्र रुप धारण करते. त्यामुळे अग्निशमन दलाकडून पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed's LIC Office Fired, Importantant Documents Burned