Bharat Bandh : लातुरात पेट्रोलपंपावरच चुलीवर स्वयंपाक

हरी तुगावकर
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ लातूर येथे आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वात लातूर बंदचे आंदोलन सुरु आहे. गेल्या काही महिन्यात घरगुती गॅसची मोठी दरवाढ झाली आहे. सामान्यांच्या खिशावर याचा मोठा ताण पडत आहे.

लातूर - मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसची प्रचंड वाढ केली आहे. त्यामुळे या दरवाढीत सामान्य नागरीक होरपळत आहे. गॅसच्या दरवाढीमुळे तर महिलांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या महिलांना येथील उषाकिरण पेट्रोलपंपावरच चुलीवर स्वयंपाक करत मोदी सरकारचा निषेध नोंदविला.

पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ लातूर येथे आमदार अमित देशमुख
यांच्या नेतृत्वात लातूर बंदचे आंदोलन सुरु आहे. गेल्या काही महिन्यात घरगुती गॅसची मोठी दरवाढ झाली आहे. सामान्यांच्या खिशावर याचा मोठा ताण पडत आहे. स्वयंपाकच्या गॅसची दरवाढ नियंत्रित ठेवण्यास केंद्र सरकारला अपयश आले आहे. एकीकडे शासन धूरमुक्त गावाचा संकल्प करीत आहे. घरोघरी गॅस असला पाहिजे याचा आग्रह धरत आहे. त्यात गॅसची दरवाढ करून सामान्यांचे कंबरडे मो़डत आहे. त्याचा निषेध करीत काँग्रेसच्या महिलांनी उपाकिरण पेट्रोलपंपावरच चूल मांडली. लाकडे पेटवली. पिटलं भाकरीचा स्वयंपाकच तेथे करून अनोखे आंदोलन केले.
 

Web Title: Bharat Bandh Agitation of the Latur bandh under the leadership of Amit Deshmukh