esakal | मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार झेडपीच्या इमारतीचे भूमीपूजन
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार झेडपीच्या इमारतीचे भूमीपूजन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनाच्या (१७ सप्टेंबरला) मुहूर्तावर जिल्हा परिषद नव्या प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. इमारतीसाठी आवश्यक सर्व परवानग्या नुकत्याच मिळाल्या असून भूमिपूजनाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे जिल्हा परिषद बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी सांगितले.

हेही वाचा: मरणानंतरही विश्रांती नाहीच! रस्ता नसल्याने मृतदेह घेण्यास नकार

मुख्य प्रशासकीय इमारतीच्या मागच्या बाजुस जिल्हा परिषदेची पाऊणेतीन एकर जमीन आहे. या उपलब्ध जागेत ही इमारत बांधण्याचे सध्या नियोजन आहे. त्यासाठी या जागेवरील आरोग्य, पंचायत, कृषी, शिक्षण व स्वच्छता विभाग, स्वच्छतागृह, एनएचएम व पाणीपुरवठा विभाग स्थलांतरित करून त्याची पाडापाडी अंतिम टप्प्यात आहे.

हेही वाचा: ‘मराठी भाषा, साहित्याचा मराठवाडा आधारवड’

ग्रामविकास विभागाने १४ जानेवारी २०२१ रोजी ४७ कोटी ३३ लाखांच्या इमारतीला प्रशासकीय मान्यता दिली. २६ मार्च रोजी ३४ कोटी ८३ लाखाची तांत्रिक मान्यता देण्यात आली. तर २३ ऑगस्टला विशेष सर्वसाधारण सभेत दर सूची ला मान्यता मिळाल्याने ८३ लाख ७३ हजार ३३३ रुपयांतुन नव्या इमारतीसाठी १० हजार ८३८ चौरस मिटरच्या क्षेत्रफळात तळमजल्यासह चार मजली इमातीच्या बांधकामाचे नियोजन केले आहे. सध्या पाच कोटी रुपये मिळालेले असून ग्रीन इमारतीची संकल्पनेतून ही इमारत बांधली जाणार आहे.

loading image
go to top