स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई....कशी ते वाचा

NND21KJP05.jpg
NND21KJP05.jpg

नांदेड : शहरातील जुना मोंढा भागातील फ्रेंड्स दुकानाच्या गोडावुन जवळ त फ्रेंड्स शॉपमध्ये विदेशी बनावट सिगारेटचा ४१ लाख ४७ हजार सहाशे रुपये किमतीचा साठा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (ता. २०) रात्री जप्त केला. या कारवाइमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणानले आहेत.

अवैध धंद्यावर कारवाइ करण्याचे निर्देश
पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्तराम राठोड यांनी अवैध धंद्यावर कारवाइ करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर यांनी नेमलेल्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक रमाकांत पांचाळ, महादेव माजंरमकर, फौजदार प्रविण राठोड, सहायक फौजदार गोविंद मुंडे, जमादार सलीम बेग, श्री. मैसनवाड, श्री. पोतदार, श्री. तेलंग, श्री. हिंगणकर, श्री. यादगीरवाड, श्री. कांबळे, चालक श्री. ठाकूर यांच्या पथकाने अवैध तंबाखु, सिगारेट प्रतिबंधक कार्यवाही करण्यासाठी काम करणाऱ्या मुंबइ येथील एनजीओचे सदस्य सुजीत खंडागळे यांच्या साथीदारासह छापा टाकला.

४१ लाख ४७ हजार सहाशे रुपयचा साठा जप्त

गोदाम व शॉपमध्ये नियमियाचे उल्लंघन वैधानिक चित्र नसलेला बनावट विदेशी सिगारेटचा साठा असल्याचे आढळून आले. यामध्ये पोलिसांनी ४१ लाख ४७ हजार सहाशे रुपये किमतीचा साठा जप्त केला. या प्रकरणी वजिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रमाकांत पांचाळ करीत आहेत. या कारवाइबद्ल पोलिस अधिक्षक विजय मगर व अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्तराम राठोड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक केले आहे.

६५ हजाराचा मुद्देमाल जप्त
शहरातील शक्तीनगर भागात विनापरवाना बेकायदेशीर कल्याण मिलन नावाचा मटका जुगार खेळत व खेळवत असताना आढळून आले. त्यांच्याकडून नगदी व जुगाराचे साहित्य, असा एकूण ६४ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव पुरी यांच्या तक्रारीवरून वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भर दुपारी भोकरला गंठण पळविले
भोकर शहरातील गंदेवार कॉलनीत एका महिलेचे भरदिवसा ३६ हजार रुपयांचे चार तोळे सोन्याचे गंठण पळविल्याची घटना गुरुवारी (ता. २०) दुपारी साडेबारा वाजता घडली. गंदेवार कॉलनीत राहणाऱ्या ज्योती विनायकराव मांगूळकर या गुरुवारी रस्त्याने जात होत्या. यावेळी त्या डुकरे व चौदंते यांच्या घराजवळ आल्या असता चोरट्यांनी जबरीने गळ्यातील गंठण काढून पोबारा केला. या प्रकरणी ज्योती मांगूळकर यांच्या फिर्यादीवरून भोकर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रुग्णालयातून मोबाईल पळविला
शहरातील एका खासगी रुग्णालयातून एकाचा ३३ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरट्यांनी पळविल्याची घटना रविवारी (ता. १६) दुपारी एक ते सायंकाळी सहा या वेळेत घडली. मोबाईल चोरट्यांनी आपला मोर्चा आता खासगी रुग्णालयांकडे वळविला आहे. हदगाव तालुक्यातील सावरगाव (माळ) येथील लक्ष्मण भीमराव देशमुख हे शहरातील एका खासगी रुग्णालयात आले असता चोरट्यांनी त्यांचा मोबाईल पळविला. या प्रकरणी लक्ष्मण देशमुख यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com