esakal | मुकुंदराज परिसरात आढळले ५१ प्रजातींचे पक्षी 
sakal

बोलून बातमी शोधा

beed pakshi 2.jpg

पक्षी सप्ताहनिमित्त येथील पक्षिमित्रांनी रविवारी (ता.आठ) मुकुंदराज परिसरात केलेल्या निरीक्षणात ५१ प्रजातींचे पक्षी आढळले. सध्या नद्या, तलावात पाणी असल्याने स्थलांतरित पाणपक्षी काही प्रमाणात यायला सुरवात झाली आहे. 

मुकुंदराज परिसरात आढळले ५१ प्रजातींचे पक्षी 

sakal_logo
By
अनिरुद्ध धर्माधिकारी

अंबाजोगाई (बीड) : पक्षी सप्ताहनिमित्त येथील पक्षिमित्रांनी रविवारी (ता.आठ) मुकुंदराज परिसरात केलेल्या निरीक्षणात ५१ प्रजातींचे पक्षी आढळले. सध्या नद्या, तलावात पाणी असल्याने स्थलांतरित पाणपक्षी काही प्रमाणात यायला सुरवात झाली आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अंबाजोगाई तालुक्यात पाच ते १२ नोव्हेंबरदरम्यान पक्षी सप्ताह साजरा झाला. यानिमित्त अंबाजोगाईच्या बुट्टेनाथ व मुकुंदराज परिसरात पक्षिमित्रांनी निरीक्षण केले. देशाच्या इतर भागातून व परदेशातून हिवाळ्यात स्थलांतर करणारे पक्षी यायला प्रारंभ झाल्याचे या निरीक्षणात आढळले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

असे आढळले पक्षी 
पक्षिमित्रांच्या दोन तासांच्या निरीक्षणात करडा धोबी, पांढरा धोबी, कवड्या धोबी, पाषाण गोजा, कृष्ण थिरथिरा, श्वेतकंठी वटवट्या, लाल मुनिया, वेणू वटवट्या, गोरली, भारीट आदी ५१ प्रकारचे पक्षी आढळले. पक्षिमित्रांनी मुरंबी तलावावर फेरफटका मारला असता दरवर्षी येणारे पाणपक्षी मात्र अजून आलेले आढळले नाहीत. तुतवार, नकटा, हाळदीकुंकू, थापट्या असे काही पक्षी तुरळक संख्येने दिसले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या पक्षिमित्रांचा पुढाकार 
पक्षीनिरीक्षणात डॉ. शुभदा लोहिया, मुन्ना सोमाणी, नीरज गोड, डॉ. सुशील घाडगे व अभिजित लोहिया यांनी पुढाकार घेतला. मुकुंदराज परिसरात एस ग्रुपने, वन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पक्षीनिरीक्षण केले. 

(संपादन-प्रताप अवचार)