औरंगाबादेत भाजप उपमहापौराचा राजीनामा

माधव इतबारे
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

मुख्यमंत्री पदावरून शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर औरंगाबादेत शिवसेना भाजपमध्ये वाद सुरू आहे. भाजपने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वतंत्र आसन व्यवस्था करून शिवसेनेला साथ न देण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा आयोजित केली होती.

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदन ठरावावरूनवरून महापालिकेत शुक्रवारी (ता.13)  सर्वसाधारण सभेत शिवसेना-भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. राज्यातील जनतेने महायुतीला कौल दिलेला असताना शिवसेनेने मात्र अभद्र आघाडी करून  मुख्यमंत्री बनविला, असा चिमटा भाजप नगरसेवकांनी काढताच  आम्हाला संस्कार शिकवू नका, सांगत शिवसेनेने प्रतिहल्ला केला. दरम्यान औरंगाबादची जनता आपल्याला जाब विचारत असल्याचे सांगत  उपमहापौर विजय औताडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 

मुख्यमंत्री पदावरून शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर औरंगाबादेत शिवसेना भाजपमध्ये वाद सुरू आहे. भाजपने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वतंत्र आसन व्यवस्था करून शिवसेनेला साथ न देण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. यावेळी शिवसेनेचे सदस्य राजेंद्र जंजाळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. दरम्यान भाजपचे उपमहापौर विजय आऔताडे हे नगरसेवकांमध्ये येउन बसले. त्यावर शिवसेनेचे सदस्य त्र्यंबक तुपे यांनी सभागृहाचे काही  प्रोटोकॉल आहेत. उपमहापौरांनी डायसवरून खाली बसणे योग्य नाही.

हेही वाचा :  मोबाईल नंबर पोर्ट करायचाय? आता 'हे' आहेत नवीन नियम..
  

अर्धा तास शिवसेना-भाजपा नगरसेवकांचा सभागृहात गोंधळ

याबाबत  त्यांनी खुलासा करावा अशी मागणी अशी मागणी केली. त्यानंतर सभागृहात गोंधळ सुरू झाला. शिवसेना- भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. मुख्यमंत्र्यांचे आम्हाला देखील अभिनंदन करायचे आहे त्यामुळे घाईगडबडीत हा ठराव आणू नका, अशी मागणी भाजपा सदस्यांनी केली तर तुमचे विचार आम्हाला कळले आम्हाला संस्कार शिकवण्याची गरज नाही, अशी टोलेबाजी शिवसेना नगरसेवकांनी केली. अर्धा तास शिवसेना-भाजपा नगरसेवकांचा सभागृहात गोंधळ सुरू होता. उपमहापौर राजीनामा देत आहेत, युतीत सभापती झालेल्या जयश्री कुलकर्णीही राजीनामा देणार का असा प्रश्न शिवसेनेने केला. त्यामुळे गोंधळात भर पडली. शेवटी महापौरांनी या गदारोळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला.

आणखी वाचा - आता मंत्रालयाचे कामकाज दररोज सुरू राहणार

मला पदावर राहण्याचा अधिकार नाही

औरंगाबादेत युतीची सत्ता आहे. विधानसभेला देखील जनतेने युतीच्या बाजूने कौल दिला मात्र शिवसेनेने अभद्र आघाडी करून मुख्यमंत्रीपद मिळविले. त्यामुळे आता जनता मला जाब विचारत आहे. या पदावर राहण्याचा मला अधिकार नाही, असे सांगत उपमहापौर विजय औताडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा आयुक्त अस्तिक कुमार पंडे यांच्याकडे सुपूर्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP deputy superintendent resigns in Aurangabad